सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर येथील कै.नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधायक समिती पिंपळनेर या संस्थेचे अध्यक्ष सुभाष दामोदर जगताप हे होते. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्र रामराव गांगुर्डे,शामकांत बारकू शिरसाठ, उत्तम सहादु माळी,विनायक दगाजी शिंदे,सुभाष उत्तम पाटील, राजेंद्र लक्ष्मण देशमुख, सुधाकर पंडित पाटील,शैलेंद्र रामराव गांगुर्डे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्वागत गीताने करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडित लक्ष्मण
गोयकर, उपमुख्याध्यापक अतुल मधुकर भदाणे,पर्यवेक्षक उदय मुरलीधर एखंडे, पुनम मराठे मॅडम यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. उपशिक्षक सचिन शिवाजी जाधव यांनी आपल्या प्रास्तविकेतून शाळेत वर्षभर राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा लेखाजोगा सादर केला.
शालेय जीवनात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक असा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शालेय व आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन होत असते, त्यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात व आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात व स्पर्धांमध्ये यश मिळवतात, अशा यशस्वी विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हे प्रेरणादायी असतात असे मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रप्रमुख हेमलता बिरारी मॅडम, सहाय्यक केंद्रप्रमुख दीपक सयाजी अहिरे, मुकेश बाविस्कर, जितेंद्र निंबादास जाधव, तुषार ठाकरे, लक्ष्मण बहिरम यांनी व्यक्त केले यावेळी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीतील 100 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व विविध शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व कळावे तसेच चांगल्या आचरणाचा जीवनात कसा फायदा होतो याचा हेवा निर्माण व्हावा यासाठी विद्यालयातून एक आदर्श विद्यार्थिनी व एक आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार देण्यात येत असतो. कार्यक्रमाप्रसंगी भूमी योगेश सूर्यवंशी व जितेश तुषार ठाकरे या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका राजश्री अकलाडे व आभार प्रदर्शन चेतना माळवंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप वाघ, सागर शहा, प्रमोद गांगुर्डे, प्रवीण पाटील, पवन पाटील, सनी गांगुर्डे, तृप्ती देवरे,जयश्री बुवा आदींनी सहकार्य केले.
Post a Comment
0 Comments