संपादकीय
तळोद्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, जैन समाजाचे मुनी हे विहार करत 13 एप्रिल रोजी मध्यप्रदेश राज्यातील जावद विधानसभा क्षेत्रातील कछोला गावातील एका मंदिरात रात्री आराम करण्यासाठी थांबले होते.त्याचवेळी रात्री काही असामाजिक तत्त्वांनी त्यांच्या जवळील सामान चोरून नेण्याच्या उद्देशाने त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली. जैन साधू किंवा साध्वी हे महाराज हे स्वतः सोबत कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू बाळगत नसून ते शाकाहारी घरातून भिक्षा मागून अन्नग्रहण करत असतात.मात्र अशा दुर्दैवी घटनेमुळे जैन संत मुनी यांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.कछोला गावातील जैन मुनीवर हल्ला ही दुर्दैवी घटना घडली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या घटनेची निष्पक्ष चौकशी करावी. या घटनेत असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लागून यांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी जैन मुनी मुक्काम राहणाऱ्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
या वेळी उपस्थित निखिल तुरखिया, महावीर जैन,गौतम जैन, कुमारपाल जैन जयकुमार जैन हंसराज जैन गुड्डू जैन कांतीलाल जैन शांतीलाल जैन प्रकाश कोचर अल्पेश जैन भरत देसाई मुकेश जैन दिनेश जैन अल्फा तुरखिया सरोज बोथरा शोभना देसाई आरती जैन भारती जैन विना देसाई क्रिया जैन आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments