Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी काळात धुळे जिल्हा उद्योग हब होणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 28 एप्रिल रोजी धुळ्यात गुंतवणूकदाराची परिषद होणार आहे. या गुंतवणूक परिषदेस राज्यातील अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.



    जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली 

       बैठकीस आमदार अनुपभैय्या अग्रवाल, दूरदृष्यप्रणालीद्वारे आमदार श्री.अमरिशभाई पटेल, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. डॉ.सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक संतोष गवळी, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी डिंगबर पारधी, खान्देश औद्योगिक विकास परिषदेचे मुख्य प्रवर्तक नितीन बंग, खान्देश इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट असोसिएशनचे सचिव भरत अग्रवाल यांच्यासह विविध उद्योजक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

       राज्यात 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस मोठे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा सहभाग असला पाहिजे. या 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये सामान्य माणसाची आर्थिक ताकदसुद्धा वाढली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुंतवणूक परिषदेचा (इन्व्हेस्टमेंट) चा कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. देशातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जातात, देशाच्या चारही दिशांना जोडणारे रेल्वेचं जाळं येथे तयार होत आहे. शैक्षणिक हब असलेला आपला धुळे जिल्हा असल्याने कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यात सोयाबीन, इलेक्ट्रॉनिक हब आहे. शिरपूर टेक्सटाइल, शिंदखेडा तालुक्यात फुड ॲण्ड फॉर्मर केंद्र विकसीत झाले आहे. साक्रीमध्ये 1 हजार मेगाव्हॅटचे सोलर प्रकल्प उभे राहिले आहे. तसेच धुळे जिल्हा मध्यप्रदेश, गुजरात राज्याला लागून आहे. जिल्ह्यातून वाढवण, जेएनपीटी बंदरास जोडणारे रस्त्यांचे जाळे आहे. त्याचप्रमाणे रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सिंचनाची व्यवस्था जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उद्योग धंद्याना अतिशय पोषक वातावरण धुळे जिल्ह्यात असून उद्योगधंदे वाढवण्यासाठी गुंतवणूक परिषद होणार असून या परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे..

Post a Comment

0 Comments