Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी व वाघदेव मार्केट मंडाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा सत्कार

 सहसंपादक अनिल बोराडे 

साक्री तालुक्यातील मंडाणे येथे गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी व वाघदेव मार्केट मंडाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंडाणे ता.साक्री येथे एन.एम.एम.एस (NMMS) प्रतिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमांचे अध्यक्ष एच.के.चौरे. मुख्याध्यापक न्यु इंग्लिश स्कूल बल्हाणे, तसेच गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष राजमल भोये, सचिव हिराताई भोये हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एस.बी.बच्छाव, पोलिस पाटील विश्वास पवार, माजी सरपंच सुरेश पवार, शिवाजी बागुल, तेजमल पवार, बंडु पवार, अजय चौधरी, संजय ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.



     मान्यवरांनी एन.एम.एम.एस (NMMS) मध्ये गुणवत्ता यादीत नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्यात प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मान चिन्ह व अग्नी पंख पुस्तक, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यात उर्वशी पवार ( मंडाणे ), गणेश बहिरम ( मंडाणे ), इशांत सोनवणे ( बल्हाणे ), मोहिणी पवार (मंडाणे), मयुरी वाघ ( विरखेल ), दिव्यानी पवार ( मंडाणे ), अमोल ठाकरे ( विरखेल ), वृषाली पवार ( पारगाव ), अमित केसोरोत ( वंजारतांडा ), हंसिका बिरारिस  ( बल्हाणे ),  पल्लवी भोये ( सितारामपुर ) या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार  नरेश अहिरराव यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments