सहसंपादक अनिल बोराडे
उपायुक्त ते सुंदर गाव निर्मितीचा धनी- यशवंत पवार
डोळ्यात स्वप्न असली की आशेचे धुमारे फुटू लागतात. त्यासाठी सुंदर विचार मनात असायला पाहिजे. नंदुरबार जिल्ह्यातील हे व्याक्तीमत्व अनेकांना आपला हक्काचा माणुस एवढी आपुलकी त्यांनी निर्माण केली. आईवडील यांची प्रेरणा सगळ्यांना सोबत घेऊन विकासाला प्रेरणा देणारे यशवंत पवार सुरुवातीला शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी जिद्द सोडली नाही. स्पर्धा परिक्षा देत असताना ते राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी ला लागले अनेक पदे त्यांनी भुषवली. नाशिक, नगर, धुळे, मुंबई,औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावुन कोल्हापूर येथुन त्यांनी सेवानिवृत्त घेतली. माझं गाव स्वच्छ गाव सुंदर गाव निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले. प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळे तसेच सुरवातीच्या काळात
शिक्षक म्हणुन काम करत असतांना आजही त्यांच्या कामात शिस्त निटनेटकेपणा व कामाचे नियोजन संस्कार, चांगले विचार त्यांच्या कार्यातुन दिसुन येते. गावासाठी आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग करु शकतो हि भावना त्यांच्या मनात घर करत होती. आज नंदुरबार जिल्ह्यात आदर्श गांव निर्मितीचा ध्यास त्यांनी घेऊन महाराष्ट्राच्या नकाशात गावाला वेगळा आयाम प्राप्त करुन दिला आहे. आज गावात त्यांनी सर्व गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला।. सामुहिक लग्न, स्वछ्चता, तंटामुक्त गाव, दारुबंदी अनेक सेवा करून गाव नकाशावर आणले गावासाठी काही तरी करायचे हा ध्यास त्यांचा आहे.
Post a Comment
0 Comments