Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घोडदे येथे माजी विद्यार्थ्यांचा 1999 च्या 10वी वर्गाचा स्नेहसंमेलन व गुरुवंदना कार्यक्रम संपन्न...

 बहिरम देव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोडदे येथे दिनांक १२/४/२०२५ रोजी १९९९ (१० वी ची बॅच) ने स्नेहसंमेलन व गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले. 

  


सदर कार्यक्रमास या संस्थेचे अध्यक्ष बापूसो कमलाकर नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास गुरुजन वर्ग या सर्वांनी उपस्थिती दर्शवली आणि ती उपस्थिती अतिशय उत्साही होती सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. व त्यानंतर सर्व माजी गुरुजन वर्गांना विद्यार्थ्यांना मार्फत शाल पुष्प व सुंदर भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. व जे आज या विद्यालयात शिकवणारे गुरुजन वर्ग यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी म्हणून उपस्थित असलेले  वैशाली क्षीरसागर,शालिनी वाणी, पुनम क्षीरसागर,अर्चना क्षीरसागर, स्वाती सोनवणे, मनीषा सैंदाणे, रोहिणी क्षीरसागर, शुभांगी नंदन,योगिता जैन डॉ.ललित क्षीरसागर, मनीष क्षीरसागर,अनिल चौधरी,चंद्रकांत चौधरी, संजय पवार, डॉ भूपेंद्र वाघ, हेमंत क्षीरसागर, मोरेश्वर माने, नौशाद खाटीख अशोक मोहिते,सुरेश सोनवणे,भटू वेंदे हे विद्यार्थी उपस्थित होते.त्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करताना पूनम क्षीरसागर, अर्चना क्षीरसागर, सोनाली क्षीरसागर ,मनीषा सैंदाणे, शुभांगी नंदन,डॉ.भूपेंद्र वाघ,डॉ.ललित क्षीरसागर, चंद्रकांत चौधरी, व अनिल चौधरी यांनी आपले मनोगत मांडताना आपल्या सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला. तदनंतर आमचे गुरुजन वर्ग आ.श्री.वी.वी.वाघ सर, श्री लाडे सर ,श्री घरटे सर ,श्री क्षीरसागर सर ,श्री ऐ जे पाटील सर, श्री डी पी पाटील सर, श्री गवळी सर, श्री नांद्रे सर,मुख्याध्यापक आप्पासो सुनील पाटील सर, व त्यानंतर अध्यक्ष बापूसो श्री कमलाकर पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले. सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्याही आमच्याबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यक्रमास महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोडदे यांचे अनमोल सहकार्य लाभले आदरणीय श्री धिवरे सर यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले. व कार्यक्रमाचा समारोप श्री गावित सर यांनी केले व त्यानंतर सर्व शिक्षक आजी माझी व विद्यार्थी मिळून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व जाताना एकमेकांचा निरोप घेऊन सांगता केली.

Post a Comment

0 Comments