Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ऍड जया आर चांदणे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

            सहसंपादक अनिल बोराडे 

कायदेतज्ज्ञ राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून पिंपळनेर पोलिस ठाण्याजवळ व नवं तहसील कार्यालयाजवळ ऍड जया आर चांदणे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या शुभ प्रसंगी मा. सभापती संजय ठाकरे यांनी फित कापुन कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी  बहुजन समाज पार्टी जिल्हा संघटक मिलिंद बैसाणे यांच्या हस्ते नारळ वाढुन उद्घाटन करण्यात आले पिंपळनेर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण जी बर्गे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर माजी सरपंच देवा भाऊ सोनवणे,बहुजन समाज पार्टी जिल्हा संघटक मिलिंद बैसाणे,प्रा आकाश चांदणे,पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप  पत्रकार अनिल बोराडे, शिवसेनेचे अतुल चौधरी,सह सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते एडव्होकेट.कार्यालय उद्घाटन प्रसंगी ऍड जया चांदणे म्हणाल्या मी माझ्या सर्व समाजातील शोषीत आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन मी फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत जातभेद धर्म न पाहता सर्व समाज व घटकांतील नागरीकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असेन  नागरिकांना वाटते की सर्वच पैसा असतो असे नाही न्याय व कायदा हा सर्वांसाठी एकच असतो मी एक महिला आहे महिलांसाठी सामाजिक कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती करणे हे माझे कर्तव्य आहे 




एडव्होकेट जया आर चांदणे यांचे कामकाज धुळे जिल्ह्यातील सत्र न्यायालय व साक्री सत्र न्यायालय येथे कामकाज सुरू असते साक्री तालुक्यातील व पिंपळनेर शहराचा आसपास खेड्यातील नागरिकांना सोईस्कर होईल व प्रत्येक वेळेस धुळे व साक्री येत माझ्या क्लायंट ला आर्थिक वा कुठल्याही परिस्थितीत समस्या उद्भवू नये म्हणून कायदेतज्ञ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळनेर शहरात संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments