सहसंपादक अनिल बोराडे
महाराष्ट्र राज्य माध्य. व उ.मा.शाळा मुख्याध्यापक संघाचे 63 वे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 12 व 13 एप्रिल 2025 रोजी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे दोन दिवसीय अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात
सामोडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा शिंदे यांची राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कारासाठी निवड झाली.दि.13/4/2025रोजी त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योग व मराठी भाषा मंत्री,मा.ना.उदय सांमत, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, गृहराज्यमंत्री मा.ना.योगेश कदम, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष श्री आर व्ही पाटील व धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री उदय तोरणे सर, मुख्याध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी, यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल, उपक्रमशील शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून सन्मान करण्यात आला.शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक,धार्मिक, अध्यात्मिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करण्याचे कार्य केले .त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्य.व उ.मा. मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जयदया शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल शिंदे,सचिव विनायक देवरे, मा. जि प अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहीते, जिल्हा बँक संचालक कैलास महंत्त, संस्थेचे सचिव शरद शिंदे ,जे.डी.शिंदे इंग्लिश मीडियमचे चेअरमन हंसराज शिंदे, आयटीआयचै चेअरमन प्रकाशराव शिंदे ,संजय शिंदे संचालक मंडळ ,विद्यालयातील शिक्षक, पंचक्रोशीतील अनेक शिक्षक ,मुख्याध्यापक,प्राचार्य, संस्थाचालक यांनी त्यांना दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले.भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments