Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यासाठी उत्सव समिती गठीत

 नवापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नवापूर शहरात “क्रांतीज्योती महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती” गठीत करण्यात आली आहे. ही समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे व सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे यांच्या मुख्य समन्वयकत्वाखाली स्थापन करण्यात आली.



या बैठकीत महिलांचा सन्मान करत त्यांच्या सहभागाला प्राधान्य देण्यात आले. यंदा उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणून आयुष्यमती सुनिता अमृतसागर सोनवणे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षा पदी हंसाताई पवार, डॉ. अर्चनाताई नगराळे, मंगलाताई वाघ, वैशालीताई पेंढारकर यांची निवड करण्यात आली आहे.


सचिवपदी रेखाताई सावरे, जयश्रीताई अहिरे, उषाताई ठोसरे, सुषमाताई निकम तर कोषाध्यक्ष म्हणून प्रा. मंदा मोरे, सुरेखाताई बनसोडे, ज्योतीताई बोरसे, भारतीताई पानपाटील, चित्राताई शिरसाठ, ज्योतीताई महिरे यांची निवड झाली आहे.


कार्याध्यक्षपदी भारतीबाई शिरसाठ, प्रतिभाताई अहिरे व सुवर्णा खरे यांचा समावेश आहे. तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून निर्मलाताई पवार,मनीषाताई चव्हाण,कल्पनाताई तिजविज, दर्शन ढोले, सुनिल वाघ, अशोक साठे, विजय तिजविज व जयेंद्र चव्हाण,सल्लागार म्हणून डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावीत,भालचंद्र गावीत,अजय गावीत,मिलिद निकम,संजय ठोसरे,बापू पानपाटील सर,सुनिल बोरसे ,महेद्र सोनवणे,सुलेखाताई पाटील,संध्याताई दिलीप दिवरे,चारुशीलाताई बर्डे,रेखाताई नगराळे,सुनिताताई सोनवणे,डॉ हर्षदाताई नगराळे,शबरीताई नगराळे, यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.या निमित्त विविध कार्यक्रमाचे पण आयोजन करण्यात येणार दि ११ एप्रिल २०२५ रोजी म.फुले जयंती निमित्त पुष्पहार अर्पण कार्यक्रम सायकाळी ६ वाजता,दि १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण सकाळी ९:४५ वाजता,भव्य मोटार सायकल रॅली या रॅलीचे प्रमुख गोरख नगराळे असणार आहे या मोटार सायकल रॅलीचे वेळ सकाळी १०:३० वाजता असणार आहे.तसेच सांयकाळी ५:३० वाजता भव्य शोभायाञा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासुन निगार आहे व राञी ९ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती आयोजक माजी विरोधी पक्ष नेता नरेंद्र नगराळे,सामाजिक कार्यकर्ता मनोहर नगराळे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments