सहसंपादक=अनिल बोराडे
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राष्ट्रीय पाणलोट विकास जिल्हा वार्षिक योजना सन 2023 -24 अंतर्गत आदिवासी उपाय योजना टी एस पी सर्वसाधारण निधी मधून मंजूर शेती लेव्हलिंग ची जमीन सपाटीकरणाची विकास कामे योजनेतून मळगाव पैकी डोंगरपाडा ता.साक्री जि.धुळे येथे जमीन सपाटीकरण योजना कामाचा शुभारंभ आज दिनांक 1/3 /2025 रोजी ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आला.. सरपंच किरण बागुल यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी सन २०२४ मध्ये पहिला टप्पा 80 हेक्टरवरची कामे पूर्ण झाली दुसरा टप्पा दिनांक 1.3.2025 रोजी सुरू करण्यात आला, असून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सरपंच किरण बागुल व कृषी अधिकारी अभय महाले यांच्या प्रयत्नांना विकास कामांना चालना मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. उपस्थित शेतकरी गोपीचंद गावित,विलास गांगुर्डे, पो. पा.धनजी बागुल,यशवंत अहिरे,पांडू देवरे,फुला गांगुर्डे,राजमल अहिरे,मगन गांगुर्डे,हिरामण गांगुर्डे, राजाराम भारुडे,भिकन अहिरे,गंगाराम अहिरे, सुकराम गांगुर्डे,कृष्णा पवार, सोमा कोकणी,मांगडू गांगुर्डे, बटू गांगुर्डे,विलास मावची, सोमा कुवर,पिंडा कुवर,या सर्व एकुण 45 शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी अभय महाले यांचे आभार मानले.याकामासाठी मळगावचे संरपंच किरण बागुल यांनी पाठपुरावा केला आहे, त्याच्या प्रयत्नाना मोठे यश आले. यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला.
Post a Comment
0 Comments