Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्या संदर्भात 'आंबेडकरी समाज व भिम आर्मी चे राष्ट्रपतींना निवेदन

 सहसंपादक-अनिल बोराडे 



दोंडाईचा शहर. : बिहार, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्या संदर्भात बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला  पाठिंबा दिला आहे. भिम आर्मी भारत एकता मिशन च्या वतीने  व समस्त आंबेडकरी समाज दोंडाईचा शहर व परिसरातील शिंदखेडा तालुका धुळे जिल्ह्याच्यावतीने महामहीम राष्ट्रपती यांना अप्पर तहसीलदार कार्यालय दोंडाईचा मार्फत महाबोधी विहार मुक्त करण्यासंदर्भात निवेदन सादर केले, असून निवेदनामध्ये बुद्धगयातील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करावे या ॲक्टमुळे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापनामध्ये इतर धर्मियांची संख्या जास्त असल्यामुळे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन योग्यरीत्या होत नसल्याने जगभरातील बुद्ध अनुयायांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्यामुळे महाबोधि महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्ध धर्मीयांच्या हाती देण्यात यावे व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात येऊन जगभरातील व विदेशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करावा व तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे ही मागणी भिम आर्मी धुळे  जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे सादर केली आहे.


 यावेळी दोंडाईचा शहाराचे माजी नगराध्यक्ष काकासाहेब रामभाऊ माणिक. रिपब्लिकन पक्षाचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष‌, कैलास आखाडे.भिम आर्मी धुळे जिल्हा महासचिव नवनीत बागले. (विखुर्ले )भिम आर्मी दोंडाईचा शहर अध्यक्ष किशोर भाई सुतारे.भुषण इंदे.शनी बाबा जाधव. ऑल इंडिया पँथर सेनेचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष.सुशिल रामराजे.सदासिव बेडसे.विशाल बागले.अकाश इंदवे.प्रकाश रामराजे. इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते आंबेडकरी समाज दोंडाईचा शहर व परिसरातील  उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments