सहसंपादक अनिल बोराडे
(पिंपळनेर)खट्याळ ग्रामपंचायत येथे राज्य ग्रामीण विकास संस्था,यशदा पुणे यांच्याकडून राज्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा करण्यात आला. ग्रामपंचायत मधिल ५% पेसा अबंध निधी मधुन झालेल्या विकास कामाची केस स्टडी बनविण्यासाठी यूनिसेफच्या मदतीन प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पांतर्गत साक्री तालुक्यातील खट्याळ ग्रामपंचायतीचा अभ्यास करण्यात आला. याप्रसंगी मा.श्री.सुबोध तायडे,(यशदा प्रशिक्षण संस्था पुणे)यांच्या मार्फत लक्ष्यवेध गटचर्चा आयोजित करण्यात आली. या लक्ष्यवेध गटचर्चा मध्ये पंचायत विस्तार कायदा अंतर्गत ५% पेसा अंबध निधी मधुन झालेल्या शैक्षणिक, आरोग्य, महिला व बालकल्याण,पाणी व्यवस्थापण, स्वयंमरोजगार,गाव विकास, वनसंवर्धन,पर्यटन व लक्षदिप बहुउद्देशिय संस्था कुडाशी यांच्या सहकार्यांने खट्याळ ग्रामपंचायतने ५% पेसा अबंध निधी मधुन महिलांना शिवणकाव व कर्तन प्रशिक्षण दिलेल्या ह्या प्रशिक्षणाची महाराष्ट्रभर सर्वत्र नावाजलेला उपक्रमाची दखल घेण्यात आली. मा.श्री. सुबोद तायडे यांनी खट्याळ ग्रामपंचायत व लक्षदिप बहुसंस्था यांचे कौतुक केले. वरिल विषयावर महीला व ग्रामस्थ तसेच गामपंचायत कर्मचारी व संस्था पदधिकारी यांच्या सविस्तर चर्चा करुन लक्ष्यवेद गटचर्चा संपन्न केली. या प्रसंगी .प्रमिला अहिरे (सरपंच) शैलेश शेलार (तालुका पेसा समन्वय) सुनंदा अहिरे (ग्रामसेवक) रघु गवळी (पो.पाटील) लक्ष्मण चौधरी,लक्षदिप संस्थाध्यक्ष,विजय बागुल तसेच सुरज्यामाळ, वर्दडी, विजयपुर, चिंचपाडा या गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते..
Post a Comment
0 Comments