सहसंपादक अनिल बोराडे
नासिक प्रतिनिधी:- -इन्लायटन अकॅडमी आणि किंग्डम प्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला यात आमदार सौ सीमाताई हिरे , नगरसेविका सौ माधुरीताई बोलकर मा. नगरसेविका सौ हेमलता कांडेकर यांच्या हस्ते पिंपळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांच्या कन्या व नासिक येथील खुशी हॉबी क्लासेसच्या संचालिका,व प्रसिद्ध
रांगोळी आर्टीस्ट , श्रमिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ती डि.एस.एरीगेशनचे संचालक किशोर देवरे यांच्या धर्मपत्नी सौ दीपश्री किशोर देवरे यांना नारी शक्ती पुरस्कार देऊन
सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन ईन्लाइटन अकॅडमी चे संचालक सागर मोरे,,धनंजय वाघ, इंडियन हॅरीस्टेज स्कूलच्या संचालीका.संध्या कर्पे, यांनी केले होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सातपुर भाजपा मंडळ अध्यक्ष भगवान काकड, सामाजिक.कार्यकर्ती कावेरी कांडेकर,मा.नगरसेवीका दिक्षाताई लोंढे, डॉ.पल्लवी येवले, पो.नि.दक्षता नलावडे, किर्ती माळी., माधुरी तेलतुंबडे, उपस्थित होते.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल लोकक्रांती सेनेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, अ.नि.स. धुळे जिल्हा उपाध्यक्ष व पिंपळनेर पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुरेंद्रराव मराठे, कामगार नेते बि.एन.बिरारी,अ.नि.स.शहर अध्यक्ष व्ही.एन.जिरे.प्राचार्य.ए.बी.मराठे,पिंपळनेर तालुका पत्रकार संघ यांनी अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments