सहसंपादक अनिल बोराडे
![]() |
कु.कोमल त्रिभुवन |
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्य स्तरीय 'छत्रपती शाहू महाराज विचार जागरण स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती.
शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मातंग समाजाची लेक लहुकण्या *'कुमारी कोमल रतन त्रिभुवन'* हिने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये वकृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला असल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
कु कोमल रतन त्रीभुवन हिचे मुळ गाव नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ तिच्या गावी जाऊन मा जितेंद्र जी सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मंचाच्या सर्व स्वयंसेवकांनी कु कोमल रतन त्रीभुवन चा मनोभावे सत्कार केला.
या राज्यस्तरीय स्पर्धेत शासनाकडून बक्षीसाच्या स्वरूपात रोख रक्कम रुपये 50 हजार पारितोषिक दिले जातात कु कोमल ने दुसरा क्रमांक पटकावल्याची बातमी कळताच सर्वप्रथम दूरध्वनी वरून कुमारी कोमल हिचे मंचच्या वतीने अभिनंदन व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, त्यानंतर प्रत्यक्षात मंचच्या वतीने गावात जाऊन कोमलचा सत्कार देखील करण्यात आला सत्कार प्रसंगी विचार मंचचे उद्देश व कार्य उपस्थितांन समोर मांडत सर्व मातंग समाजाच्या माता भगिनींना आणि बांधवांना समजावून सांगण्यात आले
तसेच मातंग समाजाचा उज्वल आणि दैदिप्यमान इतिहास आणि या समाजाचे राष्ट्रीय कार्य यावर देखील *सन्माननीय जितेंद्र जी सोनवणे सर यांनी प्रकाश टाकला* या सत्कार आणि समाज जागृतीच्या कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवरील सर्वच समाज बंधू आणि भगिनींनी व ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले, समाजातील सर्व उपस्थीतानी मंचच्या सर्वच स्वयंसेवकांचे मनापासून स्वागत करीत आभार देखील व्यक्त केले
"आम्ही सर्व सदैव मंचच्या सोबत आहोत आणि सोबतच राहू"असे प्रतिपादन समाजाच्या वतीने करण्यात आले सदर कार्यक्रमाची प्रस्तावना नितीन भाऊ जगताप यांनी केली. या कार्याक्रमाप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.जगन भाऊ नेटारे,मा.कृष्णा भाऊ थाटशिंगार, मा.रतन त्रिभवन आणि इतर समाजातील युवक युवती सह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.....
Post a Comment
0 Comments