सहसंपादक अनिल बोराडे
पद्मश्री बद्दल चैत्राम पवार यांचा अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या ट्रस्टीं
नी केला सत्कार.
वार्सा ता.26
बारिपाडा ता.साक्री येथील पद्मश्री चैत्राम पवार यांचा अयोध्या येथील राम मंदिर चे ट्रस्टी डॉ.अनिल मिश्रा, डॉ.आसु शुक्ला, श्री.जगन्नाथ गुळवे, सौ.सरोज गुळवे, चंद्रगोपाल पाण्डेय, श्री.जगदीश आफळे, सौ माधुरी आफळे यांनी पद्मश्री चैत्राम पवार व सौ. विमलताई पवार यांचा सत्कार केला यावेळी बारिपाडा व परिसरातील 10 गावातील नागरिकांना देवदर्शन व्हावे यासाठी. देवगिरी कल्याण आश्रम, देवगिरी प्रांत व बारिपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने 10 गावातील 70 टक्के महिला व 30 टक्के पुरूष अशी देवदर्शन सहलीचे 21 ता. पासुन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शना खाली 21 ते 27 ता. पर्यंत प्रयागराज, काशी, अयोध्या येथे देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दहा गावातील 131 महिला व पुरुष यांना देवदर्शन सध्या सुरू आहे. ता. 22 प्रयागराज दर्शन व स्नान व काशी येथे मुक्काम, काशी हुन अयोध्या व परिसर दर्शन व परत मुक्काम होता या सहलीचा हेतु म्हणजे या लोकांना देव दर्शन म्हणजे एक पर्वणी च होती.
1आमनी साहेब (पद्मश्री चैत्राम पवार) ना मुळेच राम ना दर्शन व्हयना नहितं आम्हाला ईतला दुर कोण ली येता, शेवट शेवटला का वयेना ना पण दे्व दर्शन वयना आम्ना गावकरी पक्का खुश व्हतंस असे प्रतिपादन सोमनाथ चौरे, आदर्श शेतकरी बारिपाडा व्यक्त केले
2 अयोध्या दर्शनासाठी आम्ही या बारिपाडा टिम सोबत आम्ही 131 महिला व पुरुष आम्ही कधीही गेलो नसतो परंतु या गृप बरोबर आम्ही प्रयागराज, काशी, अयोध्या हे तिर्थक्षेत्र पाहुन जसवंतीबेन,चिचविहिर-गुजत.यांनी समाधान व्यक्त केले
Post a Comment
0 Comments