सहसंपादक अनिल बोराडे
साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार समिती पिंपळनेर तर्फे दिनांक ३०/३/२०२५ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खुले कांदा मार्केट सुरू करण्यात येत आहे. तरी साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल पिंपळनेर उपबाजार समितीच्या मार्केटमध्ये विक्रीस आणावा असे आव्हान मार्केट कमिटीच्या प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मार्केट पिंपळनेर बल्हाने रस्ता, साई कृष्णा रिसॉर्ट च्या पुढे ओपन जागेवर भरणार आहे.याची नोंद शेतकर्यांनी घ्यावी.
(१)या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वाहनाला कोणती ही एंट्री फी आकारण्यात येणार नाही,(२) शासनाच्या नियमानुसार शेती मालावर कोणती ही कटती व कपात केली जाणार नाहीत(३) शेतकऱ्यांकडून हिशोब पट्टीवर कोणता ही सेवा कर घेतला जाणार नाही. (४) शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत पेमेंट अदा केले जाईल. तरी पिंपळनेर पंचक्रोशीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल पिंपळनेर उपबाजार समितीत आणावा असे आव्हान मार्केट कमिटीचे व्हा. चेअरमन भानुदास गांगुर्डे, संचालक किरण कोठावदे ,उपसरपंच रावसाहेब घरटे यांनी केले असून यावेळी पिंपळनेर मार्केट कमिटीचे लायसनधार व्यापारी तसेच कमिटीचे सचिव भूषण बच्छाव पिंपळनेर शाखा अधिकारी विशाल (बंटी) देसले व कर्मचारी रुंद उपस्थित होते.ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे
Post a Comment
0 Comments