सहसंपादक अनिल बोराडे
दहिवेल ---येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान ( पीएम उषा) उच्च व तंत्र विभाग मंत्रालय मुंबई पुरस्कृत "सेंद्रिय शेती काळाची गरज" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 21 /3/ 2025 रोजी सकाळी नऊ वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत करण्यात आले होते .या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय केदारनाथ कवडी वाले आधीसभा सदस्य कबचो उमावी जळगाव प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील वरिष्ठ संशोधक डॉ.दिनेश नांद्रे हे शाश्वत उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले तसेच डॉ.जगदीश काथेपुरी कृषी विज्ञान केंद्र धुळे, सहाय्यक संशोधक हे शाश्वत उत्पादनासाठी अद्यावयात तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले .यावेळी सेंद्रिय शेतीमध्ये प्रत्यक्ष कार्य करणारे व सेंद्रिय शेती मधून उत्पादन घेणारे भारतीय किसान संघाचे दुल्हब जाधव व दिलीप रामदास पाटील हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देणे जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्व उत्पादन वाढीसाठी अध्यय व तंत्रज्ञान पारंपारिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे जाण्याची गरज विषाद करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.सुरेश आहीरे होते पर प्रमुख अतिथी म्हणून नवोदय शैक्षणिक संस्थेचे संचालक वसंतराव बच्छाव व सत्यजित पाटील होते.यावेळी केदारनाथ कवडीवाले यांनी जल ,जमीन, जंगल हे महत्त्वाचे असून भावी पिढीसाठी जर आपल्याला शेती ठेवायची असेल तर ती सुपोषण असलेली शेती ठेवा अन्यथा शेती हे एकमेव जगण्याचे साधन सुद्धा भूमी प्रदूषणामुळे व जल प्रदूषणामुळे नष्ट होईल म्हणून सर्वांनी आपल्या शेतीतील मातीची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले त्यानंतर जगदीश काथेपुरी यांनी सेंद्रिय शेती म्हणजे काय सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान याविषयी अद्यावत माहिती दिली शेतीमध्ये वापरण्यात येणारी खते बी बियाणे योग्य पद्धतीने योग्य वेळी दिले तर त्याचा उपयोग होतो अन्यथा विकास त्याचा उपयोग न होता जमीन ही प्रदूषित होत असते म्हणून पीक नियोजन खत नियोजन व पाण्याचे नियोजन यावर भर देऊन सेंद्रिय शेतीत उत्पादन वाढवावे असे सांगितले यावेळी दिलीप रामदास पाटील यांनी स्लाईड शो द्वारे त्यांची सेंद्रिय शेती प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवत शेतीमध्ये त्यांनी त्या विविध जैविक निविष्ठा तयार केल्या आहेत त्या कशा तयार करतात तसेच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला फळे अशा पद्धतीने घेतली जातात यासंदर्भात माहिती दिली दुल्हा जाधव यांनी आपल्या जैताने येथील शिवारामध्ये गीर गाईंचे पालन करून त्या आधारे गो शेती करीत आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा अथवा किटनाशकांचा उपयोग करत कापूस कांदा हे पिक यशस्वीरित्या घेतल्याचे व त्यासाठी केलेल्या कार्याचे प्रात्यक्षिक सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंतराव बच्छाव यांनी दहिवेल परिसरातील शेतकरी हा पहिल्यापासूनच शेतीमध्ये आघाडीवर आहे सर्व प्रकारचे ज्ञान या परिसरातील शेतकऱ्यांनी आत्मसात केलेले आहे येथील शेतकरी हा इतर भागातील शेतकऱ्यांपेक्षा दोन पावले पुढे असतो असे सांगत त्यांनी या भागांमध्ये द्राक्षाचे विक्रमी उत्पादन आम्ही घेतले व जे नाशिक भागातील शेतकऱ्यांना सुद्धा जमले नाही ते येथील शेतकऱ्यांनी करून दाखवले शेतकऱ्यांमध्ये जिद्द आहे असे सांगितले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले यामध्ये सुरपान येथील गोविंदा देवरे यांनी सेंद्रिय शेती आम्ही करू परंतु लोकांनी त्यासाठी साथ दिली पाहिजे सेंद्रिय शेती उत्पादनांना जर चांगला भाव मिळाला तर निश्चितच आम्ही सेंद्रिय शेतीचा मार्ग पत्करू परंतु आता मात्र आम्ही आम्ही आमच्या घरापासून सुरुवात करू व आमच्या कुटुंबासाठी सेंद्रिय पदार्थ आम्ही स्वतः पिकवू असे सांगितले त्यानंतर कन्हैयालाल माळी यांनी सेंद्रिय शेती संदर्भात त्यांना असलेल्या शंका उपस्थित केल्यावर त्यांच्या शंकांना डॉ. नांद्रे व डॉ. काथेपुरी यांनी समाधानकारक उत्तरे दिली अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.सुरेश अहिरे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांची कामे व महाविद्यालयाने आजपर्यंत केलेली प्रगती महाविद्यालयाचे गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी आणि महाविद्यालयात असलेले संशोधक विद्यार्थी यांची माहिती दिली व सेंद्रिय शेती कार्यशाळेतून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती कशी करावी याचे ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेंद्र अहिरराव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवप्रसाद शेवाळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संजय गवळी यांनी मानले या कार्यशाळेला परिसरातून जवळपास 175 शेतकरी उपस्थित होते यामध्ये उंभरे ,देशीरवाडे,पिंपळनेर ,किरवाडे भोनगाव ब्राह्मणवेल,दहिवेल ,सुरपान ,घोडदे ,निजामपूर,जैताणे ,आमखेल ,कावठे ,छडवेल प ढवळी विहीर ,जेबापूर येथील शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments