धुळे येथे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण १७४४२ प्रकरणांचा निपटारा तसेच रक्कम रुपये २२ कोटी ४८ लाख ७७ हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये धुळे जिल्हयात दि. 22 मार्च रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयातील प्रलंबित ५९०० प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वाटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे वादपुर्व ७५५४२ प्रकरणे ज्यामध्ये ग्रामपंचायत, विज थकबाकी प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीचे थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती. या प्रकरणांपैकी ४३१ प्रलंबित प्रकरणे व १७०११ दाखलपूर्व प्रकरणे असे एकुण १७,४४२ समोपचाराने निकाली निघाली. लोकअदालतमध्ये २२ कोटी ४८ लाख ७७ हजार रूपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली.
धुळे जिल्हात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कौटुंबिक वादातील प्रकरणामध्ये ९ जोडपे पुन्हा एकत्र नांदण्यास गेले. तसेच मोटार अपघात प्रकरणापैकी १३७ प्रकरणे तडजोडीने निकाली होवुन रक्कम रू. १० कोटी ५ लाखापेक्षा जास्त रक्कम पक्षकारांना वसुल करून देण्यात आली.
या लोकअदालतसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, पक्षकार, पोलीस, सर्व बँका, सर्व ग्रामपंचायत, महावितरण कंपनी यांनी सहकार्य केले
Post a Comment
0 Comments