Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागास दिले निवेदन


सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर लाटीपाडा उजव्या कालव्यातील उन्हाळ्यातील एक आवर्तन सोडण्याबाबत पाटबंधारे विभाग पिंपळनेर यांना निवेदन दिले.

सदर उजव्या कालव्यातून आवर्तन सोडावे उन्हाळी एक आवर्तन या मागणीसाठी शिवसेना व शेतकऱ्यांच्या वतीने इरीकेशन  विभाग पिंपळनेर यांच्याकडे उन्हाळी एक आवर्तन पिकांसाठी व सिंचनासाठी द्यावे अशी मागणी ठाकरे गटाच्या व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली, आता शेतकऱ्यांना पाण्याची खूप गरज आहे, त्यांना एक एक आवर्तन देण्यात यावे अन्यथा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल म्हणून शेतकऱ्यांना एक आवर्तन द्यावे, ह्या मागणीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी एरीकेशन पाटबंधारे विभाग पिंपळनेर यांच्याकडे मागणी केली. मागणी करत असतांना ठाकरे गटातील तालुका प्रमुख तुषार गवळी, उपतालुकाप्रमुख मनोज खैरनार, शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश वाघ, उपशहरप्रमुख बाबा शेख, तसेच शेतकरी प्रतिनिधी म्हणून दीपक पगारे, मा. उपसरपंच संजय जगताप, सचिन नवरे, गणेश गवळी, आदी शेतकरी व तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments