सहसंपादक अनिल बोराडे
आजच्या धकाधकीच्या जीवनात ,संगणकाच्या युगात, तंत्र शक्ती, अणुशक्तीच्या व शस्त्राच्या प्रचंड गदारोळात केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या सहाय्याने गनिमी काव्याची नीती वापरून महाकाय साम्राज्याला नामोहरम करून मुठभर इमानी,कष्टाळू राष्ट्रप्रेमी, मावळ्यांच्या व 18 पगड जातीच्या सहकाऱ्यांच्या जीवावर स्वतःचे वेगळे स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता असलेला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते.आज छत्रपती शिवाजी राहिले असते तर दगड ही जिवंत होऊन अन्यायाशी लढले असते. असे मौल्यवान प्रतिपादन शिवसेना उबाठा पक्षातर्फे पिंपळनेर नगर परिषदेसमोरील भव्य प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार 395 जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य एस.डी पाटील बोलत होते.सुरुवातीला राष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकारी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा अलौकिक ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शिवसेना उबा ठा पक्षातर्फे एमपीएससी उत्तीर्ण ,समाजकार्यात अग्रेसर व्यक्तींचा, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या बाबा फ्रेंड सर्कल युवकांचा ,मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा, राष्ट्राचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवांचा ,शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साळवे सरांनी केले.यावेळी अमोल क्षिरसागर म्हणाले छत्रपती शिवरायांनी आयुष्याच्या अवघ्या पन्नास वर्षात दीडशे किल्ल्याची पुनर्बांधणी केली,110 किल्ले नव्याने उभारले,किल्ल्याच्या आश्रयाने बंदरे,बंदराच्या अश्रने आरमार,आरमाराच्या व्यापार,अशी अर्थव्यवस्थेची घडी बसवली.एक दूरदर्शी स्वराज्याच्या सेवेतील महान युगपुरुष छत्रपतींनी रयतेसाठी निर्माण केलेले स्वराज्य ,त्याची फळे आपण चाखत आहोत ,पण त्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने काही नतदृष्ट्यांकडून सांगितला जातो,छत्रपतींना बदनाम केले जाते,या प्रवृत्ती ठेचल्या पाहिजे आणि छ.शिवाजी महाराजाचीजयतीकेव. तारीख व तिथीनुसारच नाही तर वर्षानुवर्ष छत्रपतींची जयंती साजरी केली पाहिजे ,म्हणजे येणाऱ्या पिढीला त्यातून निश्चितच प्रेरणा मिळेल असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठित मान्यवर ज्येष्ठ नागरिक, प्रताप पाटील,स.पो.नि.किरण बर्गे,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौरे,मा.उपसरपंच प्रताप पाटील,पांडुरंग सूर्यवंशी,पी.एस. पाटील,नितीन नगरकर, रोहिदास पैलवान,पोपट मिस्तरी,एस.आर.बिरारीस, शिवसेना उबाठागटाचे साक्री तालुका प्रमुख तुषार गवळी, शहरप्रमुख महेश वाघ,जिल्हा समन्वयक किशोर वाघ,महिला उपजिल्हाप्रमुख अलका वाघ,पिंपळनेर शहर प्रमुख अर्चनाताई, ता.समन्वयक नानू पगारे ,मा.ता.प्रमुख दीपक वाणी,उप ता.प्रमुख टिनू वाघ,युवा शहर अध्यक्ष मयूर नांद्रे,शहर उपाध्यक्ष मनोज खैरनार ,चिंतामण ठाकरे अशोक सोनवणे,बाबा शेख, बारकू शिंदे,कैलास हिरे,रमेश शेवाळे ,पत्रकार सुभाष जगताप,राजेंद्र गवळी, से.नि.प्राचार्य एस.डी. पाटील,भिलाजी जिरे, अनिल बोराडे, विशाल गांगुर्डे, अंबादास बेनुस्कर, चंद्रकांत घरटे ,विशाल बेनुस्कर,दिलीप बोळे,भरत बागुल,विलास जाधव,साकीब सय्यद, रफीक शेख ,न्यूज चैनल व प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते,मुस्लिम कब्रस्तान कमिटीचे सर्व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वांचा येथोचित सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप "अंधार फार झाला आता दिवा पाहिजे,या देशाला मा जिजाऊंचा शिवा पाहिजे" या गिताने झाला.
Post a Comment
0 Comments