सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर वनक्षेत्रातील मौजे. दिघावे कक्ष क्र. 226 मधिल राखीव वनक्षेत्रातील
नाल्यामधुन श्री मानिक अभिमन शेवाळे, वय वर्ष 42 रा. दिघावे त्याच्या मालकीचे असुन सदर कुबोटा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र.MH-41-BE-2398 ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये विनापरवाना माती मिश्रीत वाळु उत्खनन करुन व भरुन वाहतुक करीत असतांना वनकर्मचारी यांना मिळुन आल्याने त्याच्याकडे सदर टैक्टर चालका कडे कोणत्याही प्रकारचा उत्खनन व वाहतुक परवाना नसल्याने चालकास वनविभागाने ताब्यात घेतले तसेच ट्रॅक्टर व ट्रॉली सह जप्त करुन टैक्टर चालकास ताब्यात घेतले असून सदर टैक्टर ट्राली सह मुददेमालाची अंदाजे किंमत 5,50,000/- इतकी असुन चावका विरोधात भारतीय वन अधिनियम IFA 1927 चे कलम 26 (1) D,G, 52 तसेच कलम 65 A अन्वये वनरक्षक दिघावे यांच्याकडील वनगुन्हा क्र. 0-02/2025 दिनांक 17.03.2025 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर इसमास मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय, साक्री- 2 येथे हजर केले असता चालकास दोन दिवसाची वनकोठडी
देण्यात आली असुन पुढील तपास आर. व्ही. चौरे वनपाल दिघावे करत आहेत.
सदर ची कार्यवाही मा निनु सोमराज वनसंरक्षक प्रादेशिक धुळे,मा नितीनकुमार सिंग,
मा. उपवनसंरक्षक धुळे (IFS). वाय. पी. सातपुते सहा. वनसंरक्षक रोहयो धुळे, व्ही. के. खैरनार वनपरिक्षेत्र
अधिकारी साक्री प्रादेशिक व ओंकार एस. ढोले वनपरिक्षेत्र अधिकारी पिंपळनेर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली, आर. व्ही. चौरे वनपाल दिघावे, श्रीमती. एस. ए. ठाकरे, वनरक्षक दिघावे, मेजर ए. एम. घरटे वनरक्षक विटाई, कायम वनमजुर मोहन गांगुर्डे, बाजीराव पवार, बबलु कुवर व उज्जैन चौधरी यांनी केली.
Post a Comment
0 Comments