Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने गरजूना फळांचे वाटप





 सहसंपादक अनिल बोराडे 


संघटना पत्रकारांची असून सामाजिक कार्य करते हे विशेष - ॲडव्होकेट. अंगद गायकवाड


लातूर : प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने मंदिरासमोर व रस्त्यावर बसणाऱ्या गरीब व्यक्तींना नुकतेच फळांचे वाटप करण्यात आले. केवळ सामाजिक भानेतून व लहूकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर शहरातील डॉ. अण्णाभाऊ साठे चौकातील सोन्या मारुती, राम मंदिर, हनुमान चौकातील हनुमान मंदिर या ठिकाणी बसलेल्या गरजू व्यक्तींना केळी, चिक्कू आदी फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ॲड. अंगद गायकवाड म्हणाले की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ही संघटना  पत्रकारांची तर आहेच पण सामान्य जनतेसाठी असे सामाजिक सेवेसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे म्हणून ही संघटना विशेष असल्याचे सांगितले. यावेळी  साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त नागनाथ कांबळे, जिल्हा अध्यक्ष लहूकुमार शिंदे, राष्ट्रप्रेमचे संपादक भुजंग कांबळे, धाराशिवचे ज्येष्ठ नागरिक भागवत भरगंडे, ॲड. अंगद गायकवाड, ॲड मधुकर कांबळे, साहित्य सम्राटचे संपादक पंडित हणमंते, पत्रकार सारिका चुंगे, प्रवीण हजारे, आकाश हळकुंडे, शेषेराव गवळी, अभिषेक माने, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, पत्रकार, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments