सहसंपादक अनिल बोराडे
साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर असून डेंटल सेवा उपलब्ध नाही, जनतेचे होत आहेत हाल डेंटल सुविधा नसताना डॉक्टरांचा पगार होतोच कसा ?जनतेला पडला प्रश्न?
तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची जनतेची मागणी.
साक्री तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात डेंटल सेवेसाठी चेअर (खुर्ची) व संपूर्ण साहित्य असून येथे दंत रोगावर चिकित्सा अथवा उपचार होत नाही या ठिकाणी गट-(अ) च्या डॉक्टरांची नेमणूक झाली असल्याचे समजते मात्र डॉक्टर येथे सुविधा देत नाहीत डेंटल चे सर्व साहित्य येथील फार्माशिष्ट्येच्या ताब्यात आहेत मात्र येथील वैद्यकीय अधिकारी ही सुविधा का? सुरू करत नाहीत? डेंटल सेवा मिळावी अशी मागणी जनता करत आहे.
साक्री तालुक्यातील जनतेसाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डेंटल टेक्निशियन ची नेमणूक केलेली असून मात्र डेंटल विभाग हा बंद असतो, खरंतर किमान आठवड्यातून तीन ते चार दिवस तरी ही सुविधा सुरू असली पाहिजे आणि जनतेला जर उपचारात मिळत नसेल तर मग या डॉक्टरांचा पगार निघतो कसा? इन्क्रिमेंट कशी दिली जाते? मग नेमणूक असलेल्या ठिकाणी डॉक्टर काम का करत नाहीत? डॉक्टरांचा पगार निघत नाही का? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत.
कारण साक्री तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे मध्यभागी असून या ठिकाणी परिसरातील अनेक आश्रम शाळा देखील आहेत या ठिकाणी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे आठवड्यातून एक दिवस तरी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत व जागतिक तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत तपासणी होणे गरजेचे आहे मग ही सुविधा येथे मिळते का ?, साहित्य सर्व आहे ,डॉक्टरांची नेमणूकही आहे, मग डॉक्टर या ठिकाणी का ? थांबत नाही तर नेमके येथील दंतचिकित्सक कुठे काम करतात? या संदर्भात साक्री तालुका वैद्यकीय अधीक्षक रेखा गवळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या म्हणण्यानुसार साक्री येथे डेंटल विभागासाठी रूम आणि पाण्याची सुविधा नसल्यामुळे ते या ठिकाणी येत नसून.धुळे जिल्हा रुग्णालयात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मग साक्रीला जागा नाही,हेखर तर न पटण्यासारखे आहे.साक्रीला जागा नाही मग पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात डेंटल सुविधासाठी जागाही आहे आणि पाणी पण आहे मग या ठिकाणी देखील डेंटल सुविधा सुरू नाही. यामागील नेमके काय कारण मग साक्री येथील दंत चिकित्सक यांनी पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आपली सेवा पुरवली पाहिजे की धुळे सिव्हिल मधे सुविधा देतात की धुळ्यात खाजगी प्रॅक्टिस करतात ? समजत नाही तरी या गोष्टीकडे साक्री तालुक्यातील कार्यसम्राट आमदार सौमंजुळाताई गावित,का.गोवाल पाडवी यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. केवळ साक्रीतच नाही तर पिंपळनेर व जैताणे येथील ग्रामीण रुग्णालयातही डेंटल सुविधा उपलब्ध नाही डॉक्टर येत नाहीत म्हणून या ठिकाणी देखील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात गोरगरीब जनतेला खाजगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च करणे शक्य होत नाही व ग्रामीण रुग्णालयात सुविधा मिळत नाही, तरी शासन प्रशासन आमदार ,खासदार, यांनी या ग्रामीण भागातील सुविधांसाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे
Post a Comment
0 Comments