Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर येथे क्षमतावृद्धी प्रशिक्षण संपन्न

 





संपादकीय

प्रतिनिधी नवापूर तालुक्यातील ३ते१८वयोगटाला अनुसरून नवीन संरचनेनूसार पाच दिवशीय क्षमता वृध्दी प्रशिक्षण प्रशिक्षण टप्पा -३ आदर्श प्राथमिक विद्यालयात नवापूर येथे नवीन शिक्षण धोरणांतर्गत शिक्षक क्षमतावृद्धी 2.0 तालुकास्तरीय तिसरा टप्पा सुरू आहे. या प्रशिक्षणात तालुक्यातील 19 केंद्रातील जिल्हा परिषद, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते दिनांक 24 फेब्रुवारीते 1मार्च 2025 दरम्यान झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात शिक्षक बंधू व भगिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 चे आयोजन  एस. सी. ई. आर .टी. पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्यामार्फत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय आर.बी.चौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण तालुका समन्वयक म्हणून किशोर रायते व आदरणीय जी. पी. मगरे साहेब कामकाज पाहत आहेत.

प्रशिक्षणार्थींना भोजन व दोन वेळा चहा देण्यात येत आहे. याकामी  मगर साहेब विस्तार अधिकारी शिक्षण, बीआरसी कार्यालयातील कर्मचारी श्री.नितीन पाटील,श्री.प्रशांत पाटील श्री.विक्रम मावची,श्री.चंद्रकांत सोनवणे,श्री.नितीन मराठे,श्री.सुनील माळी* कामकाज पाहत आहेत. तसेच तज्ज्ञ सुलभक म्हणून गोविंद वाडीलेसर,ज्ञानेश्वर पुराणिक सर,दिलीप गावित सर, बाल किसन ठोंबरे सर,प्रवीण ठिंगळे सर,गोरख मराठे सर,अमोल कांबळे सर,तुषार पवार सर,गुणवंत गायकवाड सर ,विवेक वाडिले सर,महेंद्र अहिरे सर, योगेश पवार सर, गंगाराम झांझरे सर,मिलिंद जाधव सर कांतीलाल वसावे सर ,नितीन पाटील सर,उंबर्डी यांनी प्रशिक्षण दिले.प्रशिक्षणार्थी तुषार भिकन नांद्रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनपाडा यांनी कविताही सादर केली.श्रीमती चित्रा चव्हाण मॅडम सुमाणिक प्राथमिक शाळा नवापूर वसावे सर भादवड तज्ज्ञ सुलभक प्रविण ठिंगळे सर पुराणिक सर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक श्री.दिलीप गावीत सर केंद्रप्रमुख रायंगण  सुत्रसंचालन श्री.ज्ञानेश्वर पुराणिक सर व आभार आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते साहेब यांनी मानले.

संकलन -सुभाष जयराम कुवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान चिंचपाडा केंद्र-रायंगण नवापूर

Post a Comment

0 Comments