Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कर्मवीर आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न




 कर्मवीर आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न 


 पिंपळनेर येथे कर्म.आ.मा. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर तरुणांची पावले थिरकली. या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एल बी पवार यांनी केले. यावेळी विचार मंचावर  स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डॉ.सतीश मस्के आयक्युएसी चे प्रमुख प्रा. डॉ.एस.पी. खोडके व सांस्कृतिक समितींच्या सदस्यासह इतर मान्यवर व प्राध्यापक उपस्थित होते. 

यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध गीतावर धमाल केली. शेर शायरी सह नाटिका व अहिराणी आदिवासी गीतावर विद्यार्थ्यांनी भन्नाट डान्स करून या स्नेहसंमेलनाला एक रंग आणला. अनेक विद्यार्थ्यांनी व गावातील प्रतिष्ठित मान्यवरांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी पिंपळनेर येथील अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे संचालक हिरामण गांगुर्डे,पत्रकार सुभाष जगताप, अनिल बोराडे,भरत बागुल,प्रा.एस.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण प्रा. डॉ.ए.जी.खरात व प्रा. सी.एन घरटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.के.एन. वसावे व प्रा.एल.जे. गवळी केले. आभार प्रा. डॉ.वसावे यांनी मानले. कार्यक्रमाचे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित व होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी उत्साहीत दिसुन आले

Post a Comment

0 Comments