सहसंपादक अनिल बोराडे
(पिंपळनेर)मोठ्या कष्टाने अथक परिश्रमाने, आंदोलनाने, अर्ज विनंत्या करून, निवेदने देऊन उपोषणे करुन शासनाचा निधी मंजूर करून आणून सुरू केलेल्या राष्ट्रीय महामार्ग 752 जी जे.टी. पॉईंट ते सामोडा चौफुली पर्यंतच्या कामासाठी सुरुवात झाली असताना काही स्वार्थी उलट्या पायाच्या व शहराच्या विकासासाठी अडथळे निर्माण करणाऱ्या लोकांनी ते काम बंद पाडले यावेळी शिवसेना उबाठा व शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले सोबत बाबा फ्रेंड सर्कल, गोपाळ नगर मित्र मंडळ, युवा वर्ग व समस्त पिंपळनेर कर एकत्र रस्त्यावर उतरून, शिवसेना स्टाईल आंदोलन केले. रस्त्यावर गधीरोधक ऐकले होते,पण चांगल्या सुरू झालेल्या रस्त्याच्या कामाची गतिरोधक कमी नाहीत, या कामात आता आडवे आले तर त्यांना आडवे करू असं म्हणणाऱ्या आ. मंजुळाताई गावित यांच्या प्रयत्नातून आलेल्या निधीतून, सुरू झालेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न काही रस्ता कामाच्या विरोधकांनी केला ,त्याला शिवसेना स्टाईलने,बाबा फ्रेंड सर्कलने गोपाळ नगर येथील व पिंपळनेर नागरिकांनी प्रचंड विरोध करून ठेकेदाराला काम करताना आपल्याही काही जबाबदारी आहेत ,त्या पार पाडून ही काम पुनश्य सुरू करण्यासाठी सांगितले व त्यांनीही लोकांचा हा रोष पाहता काम सुरू केले.आता कृपया यात कोणी अडथळे आणू नये, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. अशा प्रखड भावना पिंपळनेर नागरिकांची, शिवसेना उबाठा व.शिंदेगट बाबा फ्रेंड सर्कल, गोपाळ नगर व पिंपळनेर वासीयांनी व्यक्त केली आहे. रस्ता तयार होत असतांना क्रुपया कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करणाऱ्यांनी काम बंद करु नका अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे पिंपळनेर करांचे कडक शब्दात सांगणे आहे
Post a Comment
0 Comments