सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील राजे शिवाजी विद्यालय येथे शिक्षक क्षमता वृद्धी तालुका स्तरीय प्रशिक्षणाचा चौथा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. हे पाच दिवसीय प्रशिक्षण (दि. 4 मार्च ते 8 मार्च 2025) दरम्यान संपन्न झाले.
या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा, व्यावसायिक शिक्षण, मूल्यशिक्षण, पर्यावरण शिक्षण, भारतीय संस्कृती व परंपरा जतन, स्थानिक शिक्षण, तसेच शालेय स्तरानुसार अभ्यासक्रम या महत्त्वाच्या घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय, क्षमता आधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मूल्यांकन प्रक्रिया, समग्र प्रगती पत्रक आणि शालेय गुणवत्ता मूल्यांकन व विकास आराखडा यावरही विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणार्थींनी पीपीटी सादरीकरण, घटक संच पुस्तिका, चर्चा व गटकार्य यांसारख्या माध्यमांतून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाच्या दरम्यान गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन शिक्षकांच्या गटकार्याचे निरीक्षण केले व त्यांचे कौतुक केले.
सुलभक म्हणून कार्यरत शिक्षक:
एन. टी. नांद्रे, मधु नागरे, महेंद्र इशी, नरेंद्र पाटील, हितेश वाडेकर, योगेश शास्त्री आणि मोतन चव्हाण यांनी प्रशिक्षक म्हणून योगदान दिले.
तसेच, एन. टी. नांद्रे यांनी "शिक्षणासाठी आता जगायचं" या लोकसहभाग गीताचे गायन करून प्रशिक्षणाला प्रेरणादायी स्पर्श दिला.
प्रशिक्षण समन्वयक व नियंत्रक म्हणून युवराज जाधव (शिक्षण विस्तार अधिकारी) यांनी जबाबदारी सांभाळली.
नंदुरबार तालुका शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या उद्दिष्टपूर्तीसाठी यशस्वी योगदान देत आहे.
Post a Comment
0 Comments