Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै.आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात स्वर्गीय शोभाताई मराठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित संगीतमय कार्यक्रम व"मातृ पितृ पूजन" सोहळा संपन्न

 सहसंपादक अनिल बोराडे



पिंपळनेर- कै.आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचलित येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय पिंपळनेर,स्वर्गीय आयांच्या संयुक्त आक्कासो.शोभाताई मराठी संगित विदयालय यांच्या संयुक्त विदयमाने कर्मवीर आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक संचालिका स्वर्गीय आक्कासो शोभाताई सुरेंद्रराव मराठे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प विजयजी महाराज काळे होते.कार्यक्रमात सुरुवातीला स्वर्गीय शोभाताई सुरेंद्रराव मराठे यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दोन्हीही प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले व दीपप्रज्वलन करून विविध कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्था परिवाराच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

     पिंपळनेर परिसरातील तमाम संगीत प्रेमींसाठी मागील वर्षी पासून सुरू करण्यात आलेले स्वर्गीय आक्कासो शोभाताई सुरेंद्रराव मराठे संगीत विद्यालय पिंपळनेर या विद्यालयाच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या पहिल्या सहा विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मातृ पितृ दिन साजरा करण्यात आला.

       या प्रसंगी स्वर्गीय शोभाताई  मराठे संगीत विद्यालयाच्या वतीने अभिवादनपर भावसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यामध्ये भक्ती गीते,आईचे महत्व दर्शविणारे कर्णमधुर गीते,बी. एड कॉलेजच्या विद्यार्थिनी शिक्षिका व विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केले.या अभिवादनपर संगीत गीतांच्या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.श्रीमती त्रिशीला साळवे व संगीत शिक्षक श्री.एन.एस .खैरनार यांनी केले. सुमधुर अशा मैफिलीने उपस्थितांची दाद मिळविली.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्राचार्य एस.एस.पवार यांनी संस्थेचा माहितीपट तसेच विविध उपक्रमांची माहिती सादर केली.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एम.डी

मराठे व चेतन बाविस्कर यांनी स्वर्गीय शोभाताई मराठे व स्वर्गीय मनकर्णाबाई मराठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

     सदर विविध कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे प्रतिष्ठित व्यापारी तथा ह.भ.प भालचंद्र शंकर दुसाने,माजी कृषी अधिकारी पी.जे. पाटील,केंद्रप्रमुख मुकेश बाविस्कर , बल्हाने हायस्कूलचे मुख्याध्यापक एच.के.चौरे, प्रा.किरण कोठावदे, मुख्याध्यापक महंत सर, दीनदयाळ सूतगिरनीचे संचालक श्री योगेश पाटील,नूतन विद्यालय सामोडेचे मुख्याध्यापक पी.एन.

घरटे,पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश पाटील यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पालक बंधू भगिनी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना विद्यालयाच्या वतीने मिष्टान्न, स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.                         कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संस्थेचे अध्यक्ष  सुरेंद्रराव मराठे, उपाध्यक्ष  सुदामराव शेळके,सचिव हिरामण गांगुर्डे ,संचालक अरुणराव शेळके,कुणाल गांगुर्डे,यजुर्वेंद्र गांगुर्डे,जयेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती एस.एस. पवार,बी.एड कॉलेजचे प्राचार्य  डॉ. सतीश पाटील, पर्यवेक्षक डी.पी.कुवर सर  यांनी आयोजन केले.प्रा.पी आर खैरनार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जेष्ठ विज्ञान शिक्षक जे.एन .मराठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था संचलित सर्व विद्या शाखांचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद  यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments