Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आचार्य प्रिप्रायमरी स्कूलचे "वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

 सहसंपादक अनिल बोराडे 



पिंपळनेर- पिंपळनेर येथे नव्यानेच सुरू झालेल्या आचार्य प्रिप्रायमरी  इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने रविवारी वाणी मंगल कार्यालय पिंपळनेर येथे मोठया उत्साहात संपन्न झाले.

       यासाठी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सुरेंद्रराव मराठे,डाॅ. शुभांगी कोतकर, डॉ. जितेश चौरे, डॉ.गिरीश जैन,ह.भ.प.विजय काळे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप,भरत बागुल,विशाल गांगुर्डे,विशाल बेनुस्कर,प्रा.डाॅ.सतीश पाटील,श्रीमती 

संगिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या स्नेहसंमेलन मध्ये आचार्यच्या विद्यार्थ्यांनी गुलाबी साडी, पुष्पा, बम् बम् बोले, शिवकन्या, उधे ग अंबे उधें, मुंडा थोडा ऑफ बीट है,अंगरो सा, सोन्याचा झुमका, झुबी डुबी,पढोगे, लिखोगे, आई विना मला करमत नाही, गुलाबी शरारा,        व्हेजिटेबल साँग, अॅनिमल साँग, शेतकरी गीत, देशभक्तीपर गीत, विठ्ठल गीत, गणपती गीत, भरतनाट्यम, लावणी, देवीचा गोंधळ अशा सर्व गीतांचा समावेश करून इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले.अशा विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांना नंतर आचार्य स्कूल मध्ये वर्षभर विविध उपक्रम आणि स्पर्धा घेतल्या गेल्या त्यांचे  बक्षीस वितरण देखील केलें गेले. या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष  रिखबचंद जैन,उपाध्यक्ष जयवंत बागड, खजिनदार सुरेन्द्रराव मराठे सचिव वाल्मीक पाटील आणि प्राचार्य प्रा. पंकज पाटील यांनी केले. या प्रसंगी आचार्य चे सर्व पालक, विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.चौरे यांनी बोलताना म्हणाले की, स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. इंग्लिश स्कूल मध्ये वर्षेभर राबवलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमांमध्ये  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या कार्यक्रमांमध्ये प्री प्रिपटर ज्युनिअर केजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी  त्यावेळी प्रमुख पाहुणे, पालक वर्ग, यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.या प्रसंगी आचार्यचे सर्व पालक,विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व पालकांनी आणि परिसरातील लोकांनी या वार्षिक स्नेह संमेलन बद्दल आचार्य चे व्यवस्थापन मंडळ आणि शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.सूत्र-संचालन आचार्य प्री प्रायमरी स्कूल च्या शिक्षिका  मानसी अमृतकर  व पूनम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दिपाली कुवर यांनी केले.

Post a Comment

0 Comments