Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बारीपाडा गावाची उंच भरारी


 



सहसंपादक अनिल बोराडे
 

अनेक लहान-मोठ्या आदिवासी पाड्यांन प्रमाणेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एक 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या या पाड्याने एक-एक उपक्रम राबवून आपली परिस्थिती मोठी भरारी घेतली आहे.

           हा छोटासा आदिवासीपाडा म्हणजे बारिपाडा होय. या पाड्यात आदिवासी बहुल वस्ती असून येथे कोकणी, मावची व भिल्ल मंडळी गुण्यागोविंदाने एकजुटीने राहतात.

या सर्व मंडळींना एकत्र घेऊन या बरिपाड्याचा कायापालट केला तो 

चैत्राम पवार यांनी.

            एका शेतकरी व निरक्षर कुटुंबात जन्म घेतलेल्या चैत्राम पवार यांनी अपार कष्ट, मेहनतीने एम.काँम.पर्यतचे शिक्षण घेतले. त्यांना नोकरीच्या अनेक संधी चालुन आल्या  परंतू गावांसाठी व तुझ्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना त्यांच्या मित्राने सल्ला दिला. 


बारिपाड्याची 1991 अगोदरची कहाणी.....

       बारिपाडा हे एक छोटस आदिवासी वस्तीच पाड या पाड्याचा परिसर म्हणजे उजाडमाळरान परिसरात वृक्ष नाहि,  विहिर मळे नाहीत. फक्त पावसाळी शेती. पावसाळा संपला की येथील नागरिकांनी मिळेल तिथे कामाला जायचे असा हा धंदा. तेथून आल्यानंतर पावसाळी पिकांची तयारी करायची मग शेतीत खत टाकायचे, नांगरणी, वखरणी करुन शेती तयार करणे.

             आज मितीला या गावात जवळ जवळ  सर्वच  शेतकरी दोबार पिक घेतात. व अनेक शेतक-यांच्या विहिरी आहेत. व भाजीपाला ही पिकवितात. आजमितीला परिस्थिती चांगली.


        परिवर्तनाची कहाणी

बारिपाडा या गावाच्या परिवर्तनाच्या इतिहासाला 1991 पासुन सुरूवात झाली. वनवासी कल्याण आश्रमातील मित्राचा सल्ला घेत व गावातील दोन-चार मित्रांराना बरोबर घेऊन एकमेकांशी सल्ला मसलत करत गावाच्या आजूबाजूला असलेला जंगलात होणारी वृक्ष तोड थांबवून सुरूवात केली.

व हळू-हळू जगंल आकारास येऊ लागला.

परिसरातील 1100 एकरचा जगंल वाढू लागला.आणि सर्व बारिपाडावासीयांनी एकत्र बसुन एकमेकांशी चर्चा करून 1992 साली वनसंरक्षण समितीची स्थापना झाली. गावाला जगंल संरक्षण साठी नियमावली तयार करण्यात आली. त्यात चराईबंदी, कु-हाडबंदी, तसेच ओल (जिवंत) झाड तोडल्यास दंड, 

झाड तोडतांना सापल्यास,  सापडवणा-यास बक्षीस. तोडणा-यास दंड अशा सर्व रूपात गावातील भांडण गावातच मिटवत. हे सुत्र लागु पडले आणि त्यातून 1100 एकर जंगल सुरक्षीत राहिले.


जंगल संरक्षणासाठी पुढे सरसावले गाव

       पुढे जाऊन गावाने दोन वाचमन  जगंलाची राखन करण्यासाठी ठेवले व त्यांना गावकरी प्रत्येकाच्या घरून ईरा(म्हणजे धान्य स्वरूपात) वर्षाचे मानधन देत.

              या उपक्रमा बरोबरच आज जगंलसंरक्षणा साठी  गावातील प्रत्येक घरातील एका नागरिकांची रात्री दिवटी असते. त्यात 8 ते 10 लोकांचा  सहभाग असतो अशा दिवट्या वर्षभर सुरूच असतात. जो दिवटीला ( जंगलाची राखण ) करायला जाणार नाही त्याला  दंड असतो.


   सरपणासाठी एक दिवस सुट......

गावाला लागणा-या सरपणासाठी वर्षातून

 एक महिना सुट ठेवला जातो. त्यात सुकलेली, झाडे, मोठ्या झाडांच्या फांद्या, सुकलेल्या फांद्या असे. काढल्या, काटेरी झुडपे वगैरे.


         असे झाले परिवर्तन......

     गावात आरोग्य, शिक्षण, दोन मुलांनवर नसबंदी, मंच्छर दाणी वापरणे, पाणी गाळून

पिणे, माठ उंचावर ठेवणे, कोरडा दिवस पाळणे,  पाण्यात डॉप टाकून पिणे, शौचालयासाठी उघडल्यावर न जाता शौचालयाचा वापर करावा. 

 मुलां- मुलींना रोज शाळेत पाठविणे.

शाळेतील मुलांचे नख काढणे, स्वच्छ कपडे, केस विंचरणे, शाळेत मुलांना न पाठवल्यास पालकांना दंड,  असे करून शिक्षणात प्रगती केली


शेती व शेतीपूरक व्यवसायात प्रगती...

           बारिपाड्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरू झाले त्यात पारंपारिक शेती बरोबरच व्यावसायिक शेती सुरू केली. त्यात जनसेवा फाऊंडेशन या कृषी क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतील प्राध्यापकांच्या  मार्गदर्शनातून  शेतीत चारसुत्री भात लागवड, बटाटा लागवड, स्टाँबेरी लागवड, गुलाब शेती, तुर लागवड,  पट्टापध्दत ऊस लागवड. यामुळे शेतीविषयक क्षेत्रात मोठी प्रगती. व पारंपरिक पिकांनबरोबर भाजीपाला, तांदळाच्या विविध जाती ची लागवड या मुळे उत्पादनात वाढ होऊन दरवर्षी बारिपाडा येथील  20 ते 22 टन तांदूळ हातोहात विकला जातो. त्या बरोबरच शेती पुरक व्यवसायात कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन, लाख उत्पादन, गुळ उत्पादन, हेही घेतले जाते.


बारिपाडा येथील पुरुष व महिला बचत गट...

             बचतगट, त्यात पुरूष व महिला असे बचत गट सुरू झाले. , बचत गटाच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्टाँल लावणे त्यात  पापड, नागली, तांदुळ, असे विविध प्रकार त्या ठिकाणी विक्री करणे. त्या माध्यमातून बचत गटातील छोट्या बचतीतून मोठं -मोठी कामे केली.  बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तांदूळ, गुळ, पापड विक्री.


* गावकरी व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून बांध.......

            गावकरी व विद्यार्थ्यांची सुट्टीतली सहल काढून श्रमदानाच्या  माध्यमातून बारिपाडा येथील जंगलात पाचशे साडेपाचशे दगडी बांध बांधले आहेत. या बांधानमुळे जमिनीची होणारी झिज थांबते व माती वाहुन जात नाही व जलस्तर टिकून रहते. हे बांध 1100 एकर जगंलात असलेल्या लहान-मोठ्या नाल्यात व  चारीत हे श्रमदानातून बांधले. यामुळे झाडांच्या मुळ्या खोलवर जातात व पाण्याची पातळी टिकून राहते. व ते पाणी जमीन मध्येच जिरते.

बारिपाडा येथील जगंलात अनेक प्रकारचे वृक्ष

               बारिपाडा जगंलात आज साग, धावबाद, तिवसा, खैर, महु, बेहडा, सांगा, धामडा, पळस, पायर, असे एकुण 340 प्रकारची झाडे आहेत.

तसेच जंगलात विविध प्रकारचे पक्षी आहेत....

        त्यात मोर, कावळा, पोपट, कांच्या, फगलफनी, सुतारपक्षी, तितर, असे 48 प्रकारचे पक्षी आहेत.

    जंगलात जंगली प्राणी आहेत.  बिबट्या, तरस, ससा आदी.

बारिपाडा येथील वनभाजी स्पर्धा....

                   कॅनडास्थित डॉ.शैलेश शुक्ल हे पी.एच.डी करण्यासाठी बारीपाडा येथे वास्तव्यास होते त्यांच्या संकल्पनेतुन सन २००४ पासून येथे वन भाजी पाककला स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेला जंगलातील विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतिपासून वन भाज्या तयार केल्या जातात.  या स्पर्धेत २००४ साली २७ स्पर्धकानी भाग घेतला. त्यानंतर हया वन भाजी स्पर्धेतील स्पर्धकांची संख्या वाढतच आहे.

        वन भाजी स्पर्धेचे संयोजन बारीपाडा 

जैवविविधता समिती व ग्राम विकास समिती बारिपाडा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विदयमाने हि वनभाजी स्पर्धा घेतली जाते.

           स्पर्धा यशस्वीतेसाठी औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, येथील  वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य करते. व बारिपाडा येथील ग्रामस्थ प्रयत्नशील असतात.

             या स्पर्धेत महिला जंगलातील औषधी व विविध भाज्या आळीब, फांद्या, ओवा, बाफळी, बांबू कोम्ब, कडव्या , हळूद, केलभाजी, कोहळा, चंदका, चित्रक, देवारी, गोगल, गोमठ, जंगलीचुच, मेका, मोका, नागगुल, राजगिरा, रानतुळस, सोनरु, सोलव्या नींबू, शिरिसफुल, तरोठा, उळशी, उळशीमोहर,वनदोडका, वनस्पतीच्या मुळया, पाने फुले, खोड साल, बी, इत्यादी.८० ते ९० प्रकारच्या भाज्या वाफेवर अथवा पाण्यात कमी तेलात पाक कृती चुलीवर तयार केली जाते.

         यास्पर्धे साठी परिसरातील बारिपाडा, मोगरपाडा, शेंदवड, चावडी पाड़ा, मांजरी, मापलगाव, ई. गावतुन आदिवासी महिला सहभागी होतात.

      या स्पर्धेसाठी  राजकीय, सामजिक कार्यकर्ते विविध प्रशासकीय अधिकारी हे आवर्जून पूर्ण वेळ उपस्थित असतात

             भारतभर गाजलेली वन भाजी स्पर्धा दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटी अथवा ऑक्टोंबरच्या महिन्याच्या एका रविवारी आयोजीत केली जाते. वन भाजी स्पर्धा सर्वांन साठी खुली राहते.व याचे नियोजन अतिशय काटेकोर पद्धतीने होत असते.

         या वन भाजीस्पर्धेतील प्रत्येक सहभागी महिलेला संसार उपयोगी वस्तुंचे बक्षीस वाटप करण्यात आले.

         आज मितीला बारिपाडा जंगलात  25 प्रकारचे कंदमुळे  व 110 प्रकारचे औषधी वनभाज्या सापडतात.

* मिनाक्षी मेहता वेल्फेअर फाऊंडेशन मुंबई यांनी बारिपाड्यासह इतर पाच गाव व पाड्यांना  32 सोलर पंप (शेती पंप )दिले.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात ब-यापैकी वाढ झाली आहे. विज गेली तरी पिकांना भरणा या सोलर शेती पंपामुळे होतो. त्यात शेतकऱ्यांना रात्री- पहाटे पाणी लावायचे काम नाहीं. व जंगली श्वापदांची भिती नाही. व पिकांना भरणा हि दिवस उजेडल्यापासुन सोलर शेती पंप सुरू होतो.

*आदिवासी विकास विभागामार्फत.. बारिपाड्यात 40 सोलर होम दिवे बसविले व परिसरातही 60 सोलर दिवे बसविले.

*बारिपाड्यावर तीन लोकांनी केली डाँक्टरेट. तर वीस प्राध्यापकांनी लिहिले शोध निबंध.

     कॅनडास्थित डॉ.शैलेश शुक्ल,  जर्मनीस्थित

डॉ.सई हलदुले, औरंगाबाद येथील डॉ. फाटक.

तर वीस प्राध्यापकांनी लिहीले शोध निबंध.


*बारिड्याला आत्तापर्यंत येऊन गेले अनेक मान्यवर........

       मा.ना.एम.के.पाटील (केंद्रीय मंत्री),  मा.ना.सुभाष भामरे( केंद्रीय मंत्री ),  मा.ना. मधुकरराव पिचड ( माजी आदिवासी विकास मंत्री), मा.ना. दादा भुसे ( पालक मंत्री धुळे), मा.ना. जयकुमार रावल ( पर्यटन मंत्री ), मा.ना. रमेश तळवलकर(राज्यमंत्री), माजी मंत्री गो.शि.चौधरी, खा. हिना गावीत,  माजी खा.बापु चौरे, माजी. खा. रामदास गावित,  

आ.डि.एस.आहिरे, माजी आ. योगेश भोये, 

माजी.आ.राजवर्धन कदमबांडे, जि.प.अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी महापौर मंजुळा गावित, 

सुनंदा पवार, 


जिल्हाधिकारी यांच्या भेटी...... श्री.दिलीप पांढरपट्टे, श्री. गोकुळ मवारे, श्री.भास्कर मुंडे, श्री. प्रकाश महाजन, श्री.राहुल रेखावार, श्री.कलशेट्टी,  श्री.रत्नाकर गायकवाड (आयुक्त मुंबई )


विदेशातील भेटी.... आँस्टेलिया, जर्मनी, अमेरिका, पेरू, बेल्जियम, डेन्मार्क,  कँनडा, इंग्लंड.

 * आय.आय.टी.विद्यार्थी भेटी.....  पवई, मुंबई, चेन्नई, खडगपुर(कलकत्ता), दिल्ली, रूरकी.

         राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू श्री आनंद गुजराल, श्री. दापोले. 

टाटा इन्स्टिट्यूट तुळजापूर, अजीम प्रेमजी विद्यापीठ बेंगलोर.

जलतज्ञ--- डॉ.माधवराव चितळे (जागतिक जल तज्ञ ), डॉ.राजेंद्र सिंह, डॉ.सुधीर भोंगळे, मधु दंडवते.

मेडीकल कॉलेज.... हिरे मेडीकल धुळे, 

डी.वाय.पाटील. मुंबई,  मेडीकल कॉलेज औरंगाबाद., सेवा औरंगाबाद येथील दोन गृप.






    

------------------------------------------------------

   बारिपाडा गावाला मिळालेले पुरस्कार

★ IFAD-Interational Fund for     Agricultural development.: व्दितीय पुरस्कार बँकॉक येथे.--2003

★ संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, महाराष्ट्र राज्य.

★ शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य.

★ आदिवासी सेवक पुरस्कार,  महाराष्ट्र राज्य.

★ डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी कृतज्ञता पुरस्कार.

★ वसुंधरा सन्मान पुरस्कार, पुणे

★ India Bio-diversity Awards-UNDP & Ministry of Environment & Forest: प्रधम पुरस्कार 2014.

★ आदिवासी अस्मिता पुरस्कार, नंदुरबार.

★ संस्कार कवच पुरस्कार, नागपूर

★ नातु फाऊंडेशन सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार, पुणे.

★ पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, मुंबई

★ गो.नी.दांडेकर स्मृती नीरा--गोपाल पुरस्कार, पुणे.

★ प्रथम पुरस्कार--- कै.वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार, मुंबई. ग्राम समिती, बारिपाडयाला.

* वनभुषण पुरस्कार-2024(वयैक्तीक)

--------------------------.        --------------.            ------------------- 

बारिपाडयातील ग्रामस्थ व ग्रामसभेचे कार्य


* 100 टक्के शौचालय मुक्त गाव, प्रत्येक शौचालयास स्वतंत्र पाण्याची टाकी.

* बारिपाडा व पंचक्रोशीतील इतर 10 पाडयांना सामुहिक वन हक्क.

* प्रत्येक घरात धुर ( प्रदुषण ) विरहित शेगडी.

* कपाशीच्या काड्या, भाताचे तुस व इतर जंगलातील काडीकचरा, यांचा वापर करून शेगडीसाठी लागणारे इंधन( ब्रिकेटस् ) यांचे उत्पादन व वापर गावात चालू झाला आहे.

* रोजगार निर्मिती--आंबा व मोहाची फुले गोळा करणे, गौण वनोपज विक्री, नागलीपापड, मत्स्यंपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, लाख उत्पादन, घायपातपासुन दोर बनविणे, शेतीमाल विक्री......

* सर्व निर्णय प्रक्रियेत महिलांचा सक्रीय सहभाग.

* एलपीजी चा वापर, जळाऊ लाकडाचा प्रश्न संपला.

* दोन- तीन मुलांनंतर स्वेच्छा पुरूष नसबंदी.

*  मागील वर्षी 175 महिलांनी 70 प्रकारच्या वनस्पतींच्या भाज्या बनवून स्पर्धेत प्रदर्शित केल्या...

* व्यसनाधीनतेचे प्रमाण( दारू, तंबाखू, तपकीर, बिडी इ.) लक्षणीयरित्या कमी करण्यत यश.

* सामुहिक निर्णय प्रक्रिया.

* प्राथमिक शिक्षणापासुन कोणीही वंचित नाही.

* परसबागेत पंचवृक्ष लागवड संकल्पनेचा प्रभावी उपयोग. लिंबू, आवळा, पेरू, पपई, व शेवगा लागवड.

          बारिपाडा हे गाव धुळ्यापासुन 100 किं.मी. अंतरावर असून, साक्री पासुन 45 कि.मी.अतरावर आहे तर पिंपळनेर पासुन 22

कि. मी. अंतरावर आहे.

Post a Comment

0 Comments