Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

 (नंदुरबार प्रतिनिधी)रसिक गावीत 



आरोपीकडुन एकुण 01,26,700/- रुपये किमतीचे मोबाईल्स हस्तगत..


दि. 26/02/2025 रोजी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार श्री. रामचंद्र बठीजा यांचे मोबाईल शॉपीतुन अश गात चोरटयानी दुकानाचे कुलूप तोडून फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने मोबाईल्स चोरुन नेले म्हणुन शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 150/2025 भा.न्या. संहिता कलम 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 06/03/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा तालुक्यातील चिरखान गावात एक इसम महागडे मोबाईल फोन स्वस्त दरात विक्री करीत आहे, बाबत खात्रिशीर माहिती मिळालेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इसमाचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून सदर इसमाचा चिरखान गावी जाऊन शोध सुरु असतांना तो मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नरेश ऊर्फ लाला दादला पावरा, वय 23 वर्षे, रा.चिखली, पोस्ट मंदाणा, ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्याचे अंगझडतीत त्याचे ताब्यात असलेल्या दोन नविन मोबाईल बाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास अधिकचे विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचे मोबाईल हे त्याचे साथीदार सुकलाल ऊर्फ मेंढी मोठा शेमळे, सागर छगन भिल, शंभू कुवरसिंग चव्हाण, सर्व राहणार चिरखान ता. शहादा जि नंदुरबार यांचेसह शहादा शहरातील काशिनाथ मार्केट परिसरातील एका बंद दुकानाचे शटर उचकावून चोरी केली असल्याचे सांगितले. तरी वर नमुद आरोपीकडुन एकुण 01,26,700/- रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकुण 13 मोवाईल्स हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले मिळाले असुन पुढील अधिक तपास सुरु आहे.


सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. मुकेश पवार, तसेच पोहेको मोहन ढमढेरे, पोना/पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, अविनाश चव्हाण, पोशि/दिपक न्हावी अशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments