सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर शहराला लागलेला कलंक मिटणार! जे टी पॉईंट ते सामोडा चौफुली पर्यंत 21 कोटी 20 लाखाचे रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते आज भूमिपूजन डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग जी 752 चे जे टी पॉइंट ते सामोडा चौफुली रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून रखडले होते धूर धुराळा व खड्डेयुक्त रस्त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते तर या रस्त्यावरील व्यावसायिकांचा व्यवसाय ही बंद होण्याच्या मार्गावर आला होता जनता अतिशय त्रस्त झाली होती कुठेतरी या कामाला स्टे असल्याचे भासत अधिकारी वर्गानेच हे काम व प्रस्ताव अडकवून ठेवला होता मात्र कुठलाही स्टे नव्हता त्यासाठी आमदार सौ मंजुळाताई गावित व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळून आणली आता या कामाला जो आडवा येईल त्याला आडवे करू पण काम मात्र पूर्ण करून दाखवू असे परखड विचार आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले यापुढेही पिंपळनेर शहराला सुंदर स्वच्छ बनवण्यास निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले व श्रीफळ वाढवून टीकाव मारून कामाचे भूमिपूजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा उपप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले यावेळी व्यासपीठावर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ, शिवसेनेचे श्याम शेठ कोठावदे, संभाजीराव आहीरराव, सौ संगीता पगारे, विशाल देसले, अमोल सोनवणे, गोकुळ परदेशी, पंकज मराठे, संदीप देवरे, हिम्मत साबळे, सर्वेश्वरदास महंत, गोवींद आचार्य,जे.टी.नगरकर, अभय शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते,
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित म्हणाले या कामाला मुद्दाम अडथळा निर्माण करून आमदार सौ गावित यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू होते पण आम्ही या कामातील सर्व अडथळे दूर करून २१ कोटी २० लाख रुपये मंजूर करून आज या रखडलेल्या कामाला सुरुवात करीत आहोत तसेच शेलबारी घाटातील काही भागही दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगत सध्या धूर धुराळा व खड्डे मुक्त करण्यासाठी या रस्त्याचे जे टी पॉइंट ते सामोडा चौफुली रस्त्याचे मजबूत डांबरीकरण कामाला सुरुवात करीत आहोत तसेच पिंपळनेर पांजरा नदीच्या दोन्ही काठावर लवकरच जॉगिंग ट्रॅक तयार करणार असून १३२ केवी सब स्टेशन ही लवकर सुरू करणार आहोत पिंपळनेर शहराला स्वच्छ सुंदर व नंदनवन करण्याचे स्वप्न असून तेही लवकर पूर्ण करणार तसेच यावेळी त्यांनी ठेकेदार विजय वाघ यांना सांगितले की काम २४ तास करा कामाच्या दर्जा उत्तम ठेवा जनतेच्या कुठल्याही तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या हा रस्ता केवळ डांबरीकरणच राहणार नाही तर न्यायालयीन अडथळे दूर झाल्यावर चौपदरीकरण व काँग्रेस करण होणार याचे पण त्यांनी दिले.
यावेळी गावकऱ्यां तर्फे धनराज शेठ जैन, रामचंद्र भामरे लीलाचंद भावसार भालचंद्र ततार, पांडुरंग सूर्यवंशी ,अविनाश पाटील, शामकांत बाबुलाल कोठवदे,बाबा पेंढारकर, जे टी नगरकर ,डॉ.पंकज चोरडिया, निलेश वाणी यांनी डॉक्टर तुळशीराम गावित व आमदार सौ मंजुळा गावित यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार केला व आभार मानले.
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे टी नगरकर , शिवा जिरे पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख बबलू चौधरी, रविंद्र सोनवणे,विक्की वाघ, विष्णू पवार,गवांदे,,कैलास सूर्यवंशी, सनी नगरकर, बबलू शेख,चंदु गवांदे , श्री सुर्यवंशी ,अरुण निकुंम, नितीन नगरकर, यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुणाल बेनुस्कर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments