सहसंपादक अनिल बोराडे
साक्री तालुक्यातील प्रतिष्ठेचा विषय असलेल्या पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरु करून शेतकऱ्यांना गतवैभव मिळवून द्यावे तसेच तालुक्यातील निजामपुर गावाचे 'विजयपुर' असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाचे धुळे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे यांनी केली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री यांची भेट घेवून आजगे यांनी तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे घातले.
साक्री तालुक्यातील गोर-गरिब, कष्टकरी, शेतकरी व आदिवासी अशा सर्वांसाठी अतिशय प्रतिष्ठेचा विषय असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखाना हा गेल्या दोन दशकांपासून बंद पडलेला आहे. सदर कारखाना सुरु व्हावा व पून्हा तालुक्याला गतवैभव मिळावे अशी संपूर्ण तालुकावासीयांची अपेक्षा आहे. कारखाना बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाताहात झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पुन्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुगिचे दिवस यावेत यासाठी पांझरा कान साखर कारखाना सुरु होणे आवश्यक आहे. २०१९ साली साहेब आपण भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी साक्री शहरात आला होतात यावेळी आपण प्रचार समेत पांझरा कान साखर कारखाना सुरु करुन दाखवू असा शब्द दिला होता. हा शब्द पूर्ण करण्याची वेळ आता आली अनेकांनी हा कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला परंतु कारखाना सुरु झाला नाही. कान साखर कारखाना आपणच सुरु करु शकतात आणि आपल्या शब्दावर विश्वास आहे. आपल्या माध्यमातून पांझरा कान सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्यात यावा अशी मागणी आजगे यांनी केली.
तसेच तालुक्यातील माळमाथा परिरातील महत्वपुर्ण च मोठ्या बाजारपेठेचे गाव असलेले निजामपुर या गावात हिंदू बहुल सर्व समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असून या गावाचे निजामपुर ऐवजी विजयपुर असे नामकरण करण्यात यावे अशी अपेक्षा सर्व ग्रामस्थांची आहे. निजामकाळाचा प्रभाव म्हणून गावाचे नाव निजामपुर झाले असावे अशी धारणा लोकांची आहे. परंतु गावातील सकल हिंदू समाजाला हे मान्य नसून निजामपुर ऐवजी आता विजयपुर असे गावाचे नामकरण व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. तरी आपल्या माध्यमातून सदर निजामपुर गावाचे सुधारित नाव विजयपुर असे करण्यात यावे अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. यावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा शब्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजगे यांना दिला.
Post a Comment
0 Comments