सहसंपादक अनिल बोराडे
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर, धुळे व आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री येथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन.
मेळाव्यात विविध २५ कंपन्यांमध्ये १३०५ उमेदवारांची होणार भरती
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत शनिवार दि. २२ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० वा राजे लॉन्स साक्री
येथे मेळाव्याचे आयोजन.
>ट्रेनी ॲप्रेंटस, ट्रेनी उमेदवार, सेल्स एक्झीकेटिव्ह ट्रेनी इंजिनियर, फिल्ड ऑफिसर, मार्केट डवलपमेन्ट
एक्झीकेटिव्ह इ. पदांची होणार भरती. साक्री विधानसभा मतदार संघातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शनिवार दि. २२ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० वा राजे लॉन्स साक्री येथे जिल्हास्तरीय पंडित दिनदयाळ उपाध्याय
जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी दिली साक्री तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर, धुळे यांच्या सहकार्याने साक्री येथे
आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उग्घाटन धुळे जिल्हाधिकारी श्री. पापळकर सो. यांचेहस्ते होणार असुन प्रमुख
पाहुणे म्हणुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवडे तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे
व जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ. श्री. तुळशिराम गावित उपविभागीय अधिकारी श्री. रोहन कुवर, तहसिलदार श्री. साहेबराव
सोनवणे, अपर तहसिलदार श्री. दत्तात्रय शेजुळ, बी.डी.ओ. श्री. शशिकांत सोनवणे व जिल्हा एम्प्लॉयमेंट अधिकारी श्री. वाकोडे
व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात १० वी व १२ वी पास/नापस, व आय. टी. आय. पदवीधर, डीप्लोमा
इंजिनियर, ॲग्रीकल्चर अशा पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात कौशल्य विकास
स्वयंरोजगाराबाबत विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात येणार असुन अर्थसहाय्य योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात विविध २५ कंपन्यांमध्ये १३०५ उमेदवारांची भरती होणार आहे. विविध कंपन्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहुन उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत. तरी पात्र युवक-युवतींना या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मेळाव्यास येतांना आपल्या शैक्षणिक पात्रतेचे मुळ कागदपत्र व त्याचा एक झेरॉक्स सेट आणावा. या मेळाव्याच्या संदर्भात आपल्या मित्र परिवारास व नातेवाईकास माहिती द्यावी. हा मेळावा यशस्वी करणेसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.तुळशिराम गावित व त्यांच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पंकज मराठे, गोकुळदादा परदेशी, संभाजी अहिरराव, ॲड ज्ञानेश्वर एखंडे,"
ॲड नरेंद्र मराठे, शामसेठ कोठावदे ,अमोल सोनवणे, बाळा शिंदे, जितु नांद्रे, छोटुराम तोरवणे, राजधर देसले (माऊली) मंगेश नेरे,
धनराज भामरे, अजय सोनवणे, राहुल भोसले, कविता क्षिरसागर, रोहित दहिते, विनित सुर्यवंशी, अशोक मुजगे, राजेश बागुल,
परेश वाणी, प्रकाश बच्छाव, बबलु चौधरी, बंटी वाघ, अजित बागुल, मंगलदास सुर्यवंशी, विजय भामरे, गोविंदा सोनवणे,गोटु चौरे, संतोष बोरकर व अन्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
Post a Comment
0 Comments