Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिक्षण मंत्री दादाभुसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 सहसंपादक अनिल बोराडे 




महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तसेच नामदार दादाजी भुसे यांचा 61 वा वाढदिवसानिमित्ताने शिवसेना कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजनाने केला वाढदिवस संपन्न

   सदर कार्यक्रम हा पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात आला .यावेळी येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच पोषण आहार वाटण्यात आला व सर्व मिळून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी प्रबोधन करण्यात आले. 

  सदर कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख श्री ज्ञानेश्वर एखंडे ,विधान सभा प्रमुख संभाजी अहिरराव ,व्यापारी आघाडीचे प्रमुख शामकांत कोठावदे, तालुका संघटक अभय शिंदे ,उप तालुकाप्रमुख बब्लू चौधरी, शहर समन्वयक चंदू कोठावदे ,तालुका युवा संघटक 

राधे पाटील ,अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष मगन अहिरे, उपविभाग प्रमुख अजय सूर्यवंशी, विभाग प्रमुख गुड्डू सूर्यवंशी, विभाग प्रमुख हरिभाऊ आंबेकर अल्पसंख्यांक बबलू शेख, सोशल मीडिया संपर्क प्रमुख विक्की याईस, संपर्क प्रमुख सागर पाटील ,शिक्षक आघाडी प्रमुख अशोक सोनवणे, सुकापुर गटप्रमुख जितेंद्र कुवर, विष्णू पवार ,हरीभाऊ आंबेकर ,मिलिंद एखंडे ,महिला आघाडीचे सुरेखा सोनवणे, मंन्सूरी खाला, आधी शिवसैनिक उपस्थित होते. 

 यावेळी जेष्ठ मान्यवरांनी मा. दादाजी भुसे यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी घोषणा 

बाजी देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments