Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर येथे घंटागाडी लोकार्पण सोहळा संपन्न



अनिल बोराडे


पिंपळनेर नगर परिषदेला एक वर्ष पूर्ण होत असल्याने पिंपळनेर नगरपरिषदे चा प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्वच्छ शहर, सुंदर शहर अभियानांतर्गत पिंपळनेर शहरासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी सहा घंटागाड्यांचे लोकार्पण सोहळा साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. मुंजळाताई तुळशीराम गावित  यांच्या शुभहस्ते पार पडला
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम गावित जिल्हाप्रमुख शिवसेना,अप्पर तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, पिंपळनेर पोलिस स्टेशन चे ए पी आय किरण बर्गे, तसेच दीपक पाटील मुख्यधिकारी नगर परिषद, पिंपळनेर, एडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे जिल्हा परिषद सदस्य, संभाजी अहिरराव विधानसभा प्रमुख शिवसेना, अमोल पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, संगीता पगारे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, शाम सेठ कोठावदे व्यापारी आघाडी,अभियंता तेजस लाढे, बबलू चौधरी शिवसेना, नगरपरिषद चे कर्मचारी सह आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार सौ मंजुळा ताई गावीत व मान्यवरांच्या हस्ते सफाई कामगारांना सेप्टि किट देण्यात आली व सफाई कामगारांचे मान्यवरांनी कौतुक देखील केले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची प्रमुख भूमिका असते पिंपळनेर शहरासाठी आज घंटागाड्या मिळाल्या हे खरे आहे परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून सफाई कामगार कमी पगारात आपल्या कामाशी प्रामाणिक राहत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी धडपड होते आज आमदारांच्या हस्ते सेप्टि किट देण्यात आली 

कार्यक्रमांच्या प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी नागरीकांना संबोधित करताना म्हणाले घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा बकेट मध्ये गोळा करण्याचे काम नागरिकांनी केले पाहिजे कचरा आपल्या जवळच्या परिसरात फेकुन परिसर अस्वच्छ दुर्गंधीयुक्त ठेवले पाहिजे त्यासाठी सहा घंटागाड्या मिळाल्या आहेत शहरासाठी शुध्द पाणी पुरवठा लवकरच सुरू करण्यात येईल, काही जागेवर स्ट्रीट लाईट आनखी लावण्यात येणार आहे शहराला नैसर्गिक लागलेली पांझरा नदीच्या दोन्ही काठावर ट्रैकर बनवण्यात येइल कचरा व्यवस्थापन कंपोस्ट तयार करण्यासाठी लवकरच यंत्रणा उभारण्यात येणार आहे असे अनेक प्रश्न स्थानिक पातळीवर नागरीकांना सोबत घेऊन विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करून सर्व कामे मार्गी लाऊन विकासाची कामे केली जातील असे आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावीत यांनी पिंपळनेर शहरातील सर्व परिवर्गतील सर्वांचे आभार मानले शहराच्या विकासासाठी नागरीकांमध्ये उत्साह पाहून भारावून गेलो ह्या ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात आम्ही फक्त माध्यमं आहोत साक्री तालुक्याचा विकास असो किंवा पिंपळनेर शहराच्या विकासासाठी आमदार सौ मंजुळाताई गावित सेवक म्हणून कार्य करतील जनतेची सेवा स्वयपुर्तीने करने हे आमचे ध्येय आहे डॉक्टर तुळशीराम गावीत पुढे बोलताना म्हणाले गेल्या कित्येक वर्षांपासून पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न काही कारणाने प्रलंबित होता आणि पिंपळनेरवाशीयांची प्रमुख मागणी मुख्य रस्ता तयार व्हावा आज मला सांगायला अभिमान वाटतो आहे पिंपळनेर नगर परिषदेला एक वर्ष पूर्ण होत असल्याने आजच्या दिवशी जाहिरपणे सांगतो आहे रस्ता लवकरच तयार करण्यात येणार आहे व त्याची वर्कआउट देखील प्राप्त झाली आहे पिंपळनेर करांचे स्वपनातले शहर व नगरपरिषद ची ईमारत ऊभी केली जाईल आता अडथळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी विरोध न करता एकजुटीने विकासासाठी समोर यावे काही प्लाब्लम असल्याने सरळ माझ्याशी संपर्क साधावा शब्द देतोय विकासासाठी आलेल्या फोनचा आम्ही स्वागतच करू असे प्रतिपादन डॉ तुळशीराम गावीत यांनी लोकार्पण सोहळा प्रसंगी संबोधित केले

नगरपरिषद चे मुख्याधिकारी दिपक पाटील यांनी वर्ष भरात शहरासाठी कोणत्या परीयोजनांचा आराखडा तयार आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला 

संभाजी अहिरराव यांनी आभारप्रदर्शन वेळी पिंपळनेर शहरात नागरिकांना आवाहन केले पिंपळनेर नगरपरिषदेत आपल्या आपल्या विचारांचा व विकासासाठी कामकणाऱ्यांना निवडणूक आना शासनाच्या दरबारी तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावीत पाठपुरावा करून पिंपळनेर नगरपरिषदेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहतील संभाजी अहिरराव यांनी केले 

सुत्र संचालन आकाश ढोले यांनी केले

Post a Comment

0 Comments