Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आयसर ची दुचाकीस्वाराला धडक एक ठार ,एक जखमी


पत्रकार 
शशीकांत शिंदे 

 विसवाडी नंदुरबार रस्त्यावरील वडदा हनुमान मंदिरा जवळ रात्री 8.30 आयसर ची दोन दुचाकी ची ला धडक एक ठार एक जखमी या दुदैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवापूर तालुक्यातील वडदा येथील शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने तसेच एक जबर जखमी झाल्याचे वृत्त गावात कळताच भयाण शांतता पसरली आहे... रात्री आठ वाजे सुमारास वडदा हनुमान मंदिरा जवळ असलेल्या आपल्या शेतात पिंकाना पाणी देवुन घरी खातगाव येथे जाणारा बाबुलाल शामु कोकणी हा आपली हिरोहोंडा क्रमांक एम एच 39 ए.एफ 70 86 तसेच खातगाव येथील दुसरा शेतकरी नाव माहिती नाही हा देखील आपची दुचाकी क्रमांक एम एच 39 8552 हा इसम सह दोघे घरी जात असतात नंदुरबार हुन भरधाव वेगाने येणारा आयसर क्रमांक एम.एच.39 ए. डी 2414 या वरिल चालक रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने येत असताना समोरील दोघा दुचाकी ला दडक दिल्याने एक दुचाकी आयसर खाली घसरुन घेवुन गेला त्यात बाबुलाल कोकणी यास हातपाया ला ,डोक्यात ,कमरेला मोठा मार लागल्याने तसेच दुसऱ्या दुचाकीस्वार देखील जबर मारहाण लागला होता ...या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे ,उप नि.किरण पाटील,पो.कॉ.लिनेश पाडवी,अनिल राठोड यांनी जखमींना ताबडतोब नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यात बाबु कोकणी हा उपचार घेत असताना मयत झाला.. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता... याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेन्द्र साबळे ,हे.कॉ.नरेन्द्र वळवी करत आहेत.....

Post a Comment

0 Comments