अनिल बोराडे
(पिंपळनेर)हमाल मापाडी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे हमाल मापाडी कामगार आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे, पिंपळनेर सामोडे चौफुलीवर या हमाल-मापाडी कामगारांनी सुरत बायपास हायवे रोखून धरत या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले आहे, या रास्ता रोको दरम्यान वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचे दिसून आले असून, जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघावयास मिळाले आहे, यावेळी या आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने हमाल मापाडी कामगार सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे,
त्या संदर्भात आंदोलक हमाल मापाडी कामगारांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळाले आहे, तर यावेळी तहसील अधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन देत प्रशासनाला हे आंदोलन पुढील काळात तीव्र करण्याचा इशारा देखील दिला आहे.
Post a Comment
0 Comments