Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाशिवरात्री व भगवान एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 सहसंपादक अनिल बोराडे 




पिंपळनेर शहरात महाशिवरात्री व भगवान एकलव्य जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून सदर भगवान एकलव्य जयंती व रैली चे आयोजन भगवान एकलव्य संघटना पिंपळनेर तर्फे करण्यात आले होते 


शहरातील सर्वस्तरातून मान्यवरांनी उपस्थित राहुन शिवशंकराच्या व भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून नतमस्तक होत भगवान एकलव्य यांच्या जयघोष करीत उपस्थित मान्यवरांनी भगवान एकलव्य यांच्या प्रतिमा टैक्टर व सजविण्यात आलेली होती पुजन केल्या नंतर रैलीला श्रीराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली सामोडे चौफुली, बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्याच्या मार्गे पंचमुखी चौक महाविरभवन ते एकवीरा नगर मार्गे मुख्य बाजारपेठ सह पुन्हा श्रीराम मंदिर येथे समारोप करण्यात आला भगवान एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त महारैली मध्ये हजारोंच्या संख्येने युवा बुजुर्ग सह महिला ही सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते 


महाशिवरात्री व भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यासाठी भगवान एकलव्य संघटना पिंपळनेर तर्फे आयोजित करण्यात आले होते त्यात अध्यक्षस्थानी डोंगर भाऊ बागुल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ जितेश चौरे,धर्मेंद्र बोरखे,

योगेश भाऊ नेरकर, एडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे,सरपंच देवा भाऊ सोनवणे,माजी पं स सभापती संजय ठाकरे , मच्छिंद्रनाथ बापु गायकवाड संस्थापक उपाध्यक्ष,पांडुरंग वामन सुर्यवंशी ,भरत मोरे, विकास पवार ,देवेंद्रभाऊ कोठावदे ,राजेंद्र सिरसाट, गुलाब माळी,वसंत माळी, निलेश कोठावदे, पंकज चोरडिया,रविंद्र मालुसरे,दिपक भारुडे, महेश वाघ,अनिल गायकवाड,बकाराम बोरसे,संजय ठाकरे,मंगल ठाकरे,रमेश ठाकरे, तारासिंग बोरसे, विजय मोरे,गिरधर सोनवणे, शरद मालुसरे,किशन‌ पवार,वरून भामरे,प्रेमचंद सोनवणे,रविंद्र सुर्यवंशी,जेष्ठ पत्रकार सुभाष जगताप,रंजित गायकवाड, दिलीप मालुसरे,कालिदास सोनवणे,श्रीराम पवार,मोहन सोनवणे,तारासिंग बोरसे,आण्णा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments