Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर जवळील मल्याचापाडा येथे भगवान कन्हैयालाल यांच्या मंदिराचे भूमिपूजन

सहसंपादक अनिल बोराडे 



 पिंपळनेर शहराच्या जवळील काही किलोमीटर अंतरावर 3 हजार लोकसंख्या असलेल्या मल्याचापाडा येथे आज रोजी सकाळी महाशिवरात्री च्या मुहूर्तावर भगवान कन्हैयालाल महाराज यांच्या मंदिराचे भूमिपूजन राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल चे चेअरमन संभाजी अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले


 मल्याचापाडा एक धार्मिक परागत असलेले छोटेसे गाव आहे गावात वारकरी संप्रदायाचा वसा असुन आज भगवान कन्हैयालाल महाराज यांच्या मंदिराचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला त्यात अध्यक्ष, चेअरमन संभाजी अहिरराव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून, धुडकू भारुडे पं स सदस्य,रिकब जैन सामाजिक कार्यकर्ते,हरी भाऊ आंबेकर माजी सरपंच, तुकाराम आंबेकर, प्रेमचंद सोनवणे, शशिकांत चौधरी, सरपंच मल्याचापाडा, विजय ठाकरे ग्रा सदस्य, रवींद्र आंबेकर ग्रा सदस्य, नवनाथ गांगुर्डे,मयुर कासार,हे होते कार्यक्रमा प्रसंगी मल्याचापाडा व पिंपळनेर पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते


सदर मंदिर हे लोक वर्गणीतून व झोळी फिरवून बांधण्यात येणार असून नागरिकांनी दांपत्यानी आपल्या परीने सरळ हाताने मदत करावी असे सांगण्यात आले आहे


Post a Comment

0 Comments