सहसंपादक=अनिल बोराडे
(धुळे प्रतिनिधी) कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे कृषि अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे,
2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदार शेतकरी यांनी आपले आधार संमती पत्र व सामाईक खातेदार शेतकऱ्यांनी आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत संबंधित कृषि सहायक यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांनी केले आहे,
सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 5 हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पिक पाहणी केलेले कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी, व ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप हंगाम 2023 च्या सातबारा उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, असे खातेधारक डिजिटायझेड गावामधील खरीप 2023 कापुस व सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार या योजनेसाठी पात्र आहेत.


Post a Comment
0 Comments