संपादकीय
त्याग आणि बलिदानाची मुर्ती म्हणजेच माता रमाई एप्रिल १९०६ मध्ये रमाबाईंचा विवाह डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांशी झाला. लग्नाच्या वेळी, रमाई फक्त ९ वर्षांच्या होत्या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे १४ वर्षांचे होते आणि ते ५ वी इयत्ता इंग्रजीमध्ये शिकत होते.काल माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती देशभरात साजरी केली गेली याच अनुषंगाने नवापूर शहरात देखील माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, माता रमाई जयंती निमित्ताने प्रा.अलका शिवाजी मगरे यांच्या महाराष्ट्राची सांस्कृतिक आई रमाई या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम,रमाई महिला मंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच भारतीय बौद्ध महासभा नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला नवापूर शहरातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी डॉ मंदा मोरे,डॉ.अर्चना नगराळे,डॉ. सुरेखा बनसोडे,श्रीमती सुनिता अमृतसागर मॅडम सौ चारुशीला बर्डे मॅडम पुनम बिर्हाडे,सौ भारती पानपाटील सौ ज्योती बोरसे सौ ज्योती महिरे,सुवर्ण खरे,मंदा बिरारी,चित्रा शिरसाठ माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे,माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहीरे, माजी नायब तहसीलदार मिलिंद निकम,छोटु अहीरे डिजिटल मिडियात काम करणारे पत्रकार आणि असंख्य आंबेडकरी अनुयायी यावेळी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments