Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आणि गेट-टुगेदर


 सहसंपादक=अनिल बोराडे 

शाळेचे नाव:विधायक युवा संघटना संचलित विद्यालय, धमनार, तालुका साक्री, जिल्हा धुळे  
दिनांक:२ फेब्रुवारी २०२५  
कार्यक्रमाचे स्वरूप: स्नेह मेळावा किंवा गेट-टुगेदर  
उद्देश:३१ वर्षांनी शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेच्या आठवणी साजर्या करणे आणि शिक्षकांचा आदर व्यक्त करणे.

---

कार्यक्रमाची माहिती:

सहभागी शिक्षक:
- एम. ओ. पाटील सर
- के आर सोनवणे सर
- व्हि. डी. शिंदे सर
- एल. एल. मंसूरी सर
- आर. बी. बच्छाव सर
- अरुण वाघ (लिपीक)
- राहुल भामरे

स्वर्गवासी शिक्षक:- 

तात्यासो श्री वसंतरावजी खैरनार- कै.ए झेड निकम सर

मुलांची नावे आणि त्यांचे योगदान:
श्रीकांत सोनवणे (नासिक):छान प्रास्ताविक केले
प्रशांत बेडसे (पुणे): कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
संजय ठाकूरआभार मांडले आणि आर्थिक नियोजन केले
राजेंद्र सोनवणे: उत्कृष्ट नियोजन
उमेश गांगुर्डे: लागणाऱ्या सर्व साहित्य उपलब्ध करून दिले
नथू सोनवणे: अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था केली
रेखा नेरे (नंदुरबार): मुलींमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केले
आशा जाधव बडोदा:सर्वांबरोबर सुसंवाद साधला
ज्योती पाटील (मंगरूळ - उर्फ चेअरमन बाई)कार्यक्रमाचे नेतृत्व केले


कार्यक्रमाची सुरुवात:
सकाळी १० वाजता सर्व माजी विद्यार्थी शाळेच्या ग्राउंडवर जमले. सुरुवातीला शाळेच्या नियमाप्रमाणे राष्ट्रगीत एकसुराने म्हटले गेले. त्यानंतर, स्वर्गवासी तात्यासो श्री वसंतरावजी खैरनार यांच्या स्मृतीस फुलांचे हार व पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे, कैलासवासी शिक्षक ए झेड निकम सर आणि इतर स्वर्गवासी मित्रांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात तात्यासो वसंतरावजी खैरनार यांची मुलगी भारतीय खैरनार यांनीही सहभाग घेतला.



अल्पोपहार आणि सरस्वती पूजन:
श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला. त्यानंतर सर्वजण मंडपात आले आणि सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. श्रीकांत सोनवणे यांनी प्रस्तावना करताना शाळेची माहिती सांगितली आणि शाळेतील मुलांमध्ये होणारे परिवर्तन, वेळेचे नियोजन इत्यादी विषयांवर चर्चा केली.



शिक्षकांचे स्वागत आणि मनोगत:
प्रस्तावनेनंतर उपस्थित शिक्षकांचे ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. त्यांनी सांगितले की, "आम्हाला तुम्ही ३१ वर्षांनीही विसरलेले नाहीत," हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला.


माजी विद्यार्थ्यांचे मनोगत:
जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शाळेच्या आठवणी काढून हसा आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले. त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदारी आणि जीवनातील चांगल्या-वाईट अनुभवांवर चर्चा केली. या प्रसंगी अनेकांचे अश्रू अनावर झाले.

उपस्थित माजी विद्यार्थी:
मुलेजगदीश खैरनार, मधुकर चौधरी (पुणे), कारभारी कारंडा, देविदास सोनवणे, दगडू श्रावण काकुळते, प्रकाश पवार, संदीप शिंदे, जयवंत सोनवणे, गोकुळ काकुळते, प्रफुल्ल नेरे, नानाभाऊ मारनर, अशोक गायकवाड  , धोंडीबा कारंडा , ज्यातीराम  वाघ
मुली: ललिता पाटील, रेखा काकुळते, रंजना वारुळे, छाया वेंडाईत, भारती रमेश सोनवणे, सुरेखा बच्छाव, अलका देवरे साधना सोनवणे, सुनिता सोनवणे, संध्या वाघ, सुरेखा चौधरी, भारती खैरनार, नकुबाई सोनवने, रत्ना देवरे , वंदना वाघ , मानिषा खैरनार



कार्यक्रमाचा समारोप:
सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप माजी विदर्यानकडून सृमती चिन्ह व फोटो फ्रेम विद्याम मुख्याद्यापक जितेंद्र खैरणार शाळेसाठी यांना सोपवण्यात आली करण्यात आला. सर्वजण जड अंतकरणाने घराच्या दिशेने निघाले. या कार्यक्रमातून शाळेच्या आठवणी पुन्हा एकदा जिवंत झाल्या आणि सर्वांना एकत्र येऊन आनंद घेण्याची संधी मिळाली.

Post a Comment

0 Comments