सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर :दि. 19/02/2025
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे समतेचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन काळातील सामाजिक परिस्थितीला हादरे देऊन नवयुग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्याचे पुजारी होते. प्रजेचे कल्याण करणे हा त्यांचा धर्म होता.असे मत इतिहास विभाग प्रमुख प्रा.एम.व्ही. बळसाने यांनी व्यक्त केले.
पिंपळनेर येथील कर्म.आ.मा. पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन.के. पाटील विज्ञान महाविद्यालय पिंपळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ए.एस. बिरारीस होते. याप्रसंगी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे,पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे संचालक व कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज जैन,पिंएसो चे संचालक हिरामण गांगुर्डे,पिंएसो चे संचालक डॉ. विवेकानंद शिंदे,पिंएसो चे संचालक सुभाष जैन, प्राचार्य डॉ.एल.बी.पवार, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.सतीश मस्के आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. बळसाने म्हणाले की, आज जीवन जगत असताना माणूस भूतकाळातच जगताना दिसतो आहे. वर्तमान क्षणिक असतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही चारशे वर्ष जिवंत आहेत. शिवाजी महाराजांचे कार्य हे सर्व जाती धर्मासाठी होते. त्यांनी प्रजेचे राज्य निर्माण केले. स्त्रियांचा मान सन्मान उंचावला. वाईट रूढी परंपरेला त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा नष्ट केल्या. अनेक लढाया त्यांनी अमावस्या दिवशी केल्या.
अध्यक्षीय समारोप करताना ए.एस. बिरारीस म्हणाले की, थोरांच्या चरित्रातून बोध घेऊन प्रत्येकाने आपले आयुष्य उज्वल बनवले पाहिजे. केलेल्या चांगल्या कर्तृत्वामुळेच आपले अस्तित्व राहत असते. आपल्याजवळ जे जे आहे ते ते आपण दुसऱ्याला दिले पाहिजे कारण माणूस शेवटी काहीच घेऊन जात नाही. म्हणून जीवन कसे जगायचे? तर थोरांच्या कार्यातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन जीवन जगायचे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या अगोदर कर्म.आ.मा.पाटील कला वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन के पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर,असे नाव असलेल्या फलकाचे अनावरण पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. हा फलक सर्वांना दिसावा, फलकामुळे महाविद्यालयात प्रवेश करता यावा म्हणून हा फलक कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी केले. आभार प्रा.सी.एन.घरटे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
पिंपळनेर महाविद्यालयात शिवजयंती निमित्त व्याख्याना प्रसंगी प्रा. मनोज बाळसाने, सोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. एस.बिरारीस, सुरेंद्र मराठे, धनराज जैन, एच. आर. गांगुर्डे, डॉ. विवेकानंद शिंदे, सुभाष जैन, प्राचार्य डॉ. लहू पवार आदी.
2) पिंपळनेर येथील वरिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती निमित्त महाविद्यालयाच्या नावाच्या फलक अनावरण प्रसंगी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे सुरेंद्र मराठे आत्माराम बिरारीस, धनराज जैन, हिरामण गांगुर्डे, डॉ. विवेकानंद शिंदे, सुभाष जैन, प्राचार्य डॉ. लहू पवार, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर वृंद, विद्यार्थी.
Post a Comment
0 Comments