इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर येथे आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्र विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी इयत्ता बारावीचा विद्यार्थी चि.राकेश शुक्ला याने आपल्या भारदस्त आवाजात शिवगर्जना सादर केली आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे ज्यांचे वाढदिवस या दिवशी होते त्यांचा विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री डी पी कुवर सर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्वांना मिष्ठान्न म्हणून चॉकलेटचे वाटप केले.
शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने "जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे" आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. हातात भगवे झेंडे, शिवगर्जना,शिवचरित्रावर आधारित घोषवाक्य, यामुळे परिसर निनादला. शिस्तबद्ध व सुरेख अशी पदयात्रा पाहून नागरिकांनी कौतुक केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री.सुरेंद्रराव विनायकराव मराठे,संचालक श्री के एस गांगुर्डे ,श्री वाय एस गांगुर्डे श्री जयेश मराठे, प्राचार्या श्रीमती एस एस पवार मॅडम, पर्यवेक्षक श्री डी पी कुवर सर ,जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री जे एन मराठे सर सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री एम डी मराठे सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री पी आर खैरनार सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments