Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा येथे करोडो चा भ्रष्टाचार शासनाचे दुर्लक्ष तक्रारदाराने उपसले उपोषणाचे हत्यार

 !! कार्यकारी अभियंता एम. बी वसावे व उपविभागीय अभियंता एस. एम जगताप यांनी केलेल्या भ्रष्टाचारा ची चौकशी करा !! 



(प्रतिनिधी)सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे कार्यरत कार्यकारी अभियंता एम बी वसावे व उपविभागीय अभियंता एस.एम जगताप यांनी आदिवासी घटक कार्यक्रमात सन 2023 -24 या वर्षात प्राप्त झालेल्या निधीत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आलेले आहे

 अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत चालू वर्षात लक्षावधी  रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.शहादा उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत कार्यारत असणारे अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम उपविभाग अक्कलकुवा या ठिकाणी सुरू असलेल्या आदिवासी घटक योजनेच्या कामांतर्गत  रस्त्याच्या कामात कोठावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आलेले आहे. सदरील कामाचे मोजमापाच्या  नोंदी करताना मोजमाप पुस्तकात खोट्या नोंदी घेऊन सदरील रस्त्याचे काम करताना डांबर कमी प्रमाणात वापरून अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आलेले आहेत. आदिवासी घटकातील योजनेतील पैशांचा अपहार करणे हा मोठा गुन्हा असून या भ्रष्टाचारामुळे  आदिवासी बांधवांना कोणत्याही प्रकारे सुविधा पुरवल्या जात नसल्याची खंत तक्रारदार यांनी व्यक्त केली आहे. सदरील कामांची समक्ष पाहणी तक्रारदार अनंत मोहन पटेकर( माहिती अधिकार कार्यकर्ते) तसेच त्यांचे सर्व सहकारी यांनी समक्ष जाऊन तपासणी केली. कामाची पाहणी करत असताना काम निवेदा प्रमाणे  शर्ती अटीनुसार झालेले नसून. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून कामे कागदपत्रे पूर्ण केल्याचे दाखवले आहे. सदरील काम कार्यकारी अभियंता एम बी वसावे यांच्या  नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या असून ते उपविभागीय अभियंता एस एम जगताप यांनी कागदपत्रे पूर्ण केल्याचे दाखवले आहे. काम न करता बिले काढून घेणे ही मोठी शोकांतिका सार्वजनिक बांधकाम विभागात पहावयास मिळत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा या विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखाली झालेले सर्व कामे तपासून निविदेतील   शर्ती अटीप्रमाणे सर्व कामे झालेली आहेत की नाही याची शहानिशा करणे गरजेचे आहे तसेच आदिवासी घटक योजनेतील झालेल्या कामाच्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी व या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व दोषी आढळलेल्या  अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक 17 2 2019 पासून क्युमन क्लब जवळ जेलरोड   धुळे या ठिकाणी तक्रारदार अनंत मोहन पटेकर यांचे सह सामाजिक कार्यकर्ते तसेच आरटीआय कार्यकर्ते अभिषेक सोनवणे रोहिदास थोरात महिला अध्यक्ष लीनाताई अहिर(मुंबई ) सौरभ लोणकर शरद भालेराव तसेच अन्य महिला सहकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. संबंधित कामांची चौकशी होत नाही व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत सदरील उपोषण चालूच राहील असे तक्रारदार अनंत पटेकर यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments