धक्कादायक
सहसंपादक=अनिल बोराडे
थाळणेर पोलिस स्टेशन हद्दीत सुनील नारायण कोळी या इसमाने बायको बरोबर च्या घरगुती वादातून आपल्या ५ वर्षाच्या मुलाला आणि ३ वर्षाच्या मुलीला तापी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून या दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आल्या नंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे... या प्रकरणी पोलिसांनी सुनील कोळी या नराधम बापाला ताब्यात घेतले असून थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे....
संध्याकाळच्या दरम्यान थाळनेर येथील भुईकोट किल्ला शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्याचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली.. त्यानंतर गावातील नागरिकांनी तापी नदीच्या पात्राकडे धाव घेतली. यावेळी गावातील तरुणांनी जीवाची परवा न करता तापी नदीत उडी मारून या मुलांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी दोघं चिमुकल्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.ही लहान मुले सुनील नारायण कोळी याचा मयत मोठा मुलगा कार्तिक सुनील कोळी (वय वर्ष ५) व चिमू सुनील कोळी (वय वर्ष ३) यांचे असल्याची माहिती मिळाल्यावर नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. सुनील कोळी याचे आपल्या पत्नीसोबत वाद झाल्यावर त्याने दोघ लहान मुलांना तापी नदी पात्रात टाकल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलिसांनी सुनील कोळी याला ताब्यात घेतले आहे...याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
Post a Comment
0 Comments