सहसंपादक=अनिल बोराडे
आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान, रोहोड ग्रामपंचायत, व कन्हैयालाल बहुद्देशीय संस्था यांचा संयुक्त उपक्रम.
छडवेल कोर्डे- रोहोड ता.साक्री आदिवासी समाजातील कलावंत, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, खेळाडू यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांच्या आविष्कारास संधी मिळावी, युवावर्गाला योग्य दिशा मिळावी आणि आदिवासी परिसरात शैक्षणिक वातावरण मिळावे उदात्त दृष्टिकोनातून प्रतिष्ठान तर्फे दोन दिवसीय चौथे आदिवासी कला क्रीडा महोत्सव रोहोड ता. साक्री येथे संपन्न झाले.
महोत्सवातील निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, धावणे, मॅरेथॉन, खोखो, कबड्डी, व्हॉलीबॉल, दोरी उडी, गीतगायन, नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये जवळपास १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात लहान बालके, युवावर्ग आणि प्रौढ कलावंत-खेळाडू सहभाग नोंदवला.
महोत्सवात स्पर्धकांना आदिवासी समाजाचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त, बारीपाड्याचे शिल्पकार चैत्राम पवार, माजी खासदार बापूसाहेब चौरे, इंजि.के.टी. सूर्यवंशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, कार्याध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, संस्थेचे चेअरमन डॉ.मनीष सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. महोत्सव प्रसंगी पं. स. माजी सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सरपंच कल्पना राऊत, उपसरपंच वैशाली चौरे, जि प सदस्य विश्वास बागुल, पोलिस पाटील संजय साबळे, डॉ. प्रतिभा चौरे, गणेश गावित, पंकज सूर्यवंशी, हिंमत साबळे, बी.एम. बागुल, राजेंद्र पवार, विजय चौरे, संदीप चौरे, राजू गमा गायकवाड, दशरथ भोये, मांगीलाल गांगुर्डे, छाया साबळे, सुनिता सूर्यवंशी, जेजीराम साबळे, भास्कर राऊत, दादा सुर्यवंशी,भैया खैरनार, विजय बहिरम, सुरेश पवार, मंगलदास सूर्यवंशी, कैलास ठाकरे, सुभाष चौरे, पंडित साबळे, किरण राऊत, रमेश सूर्यवंशी, दिलीप गायकवाड, छोटू सूर्यवंशी, योगेश साबळे, अण्णा सूर्यवंशी, धोंडू ठाकरे, भटू सूर्यवंशी, यशवंत जगताप ,काळू सूर्यवंशी, यांच्यासह रोहोड परिसरातील लोकनियुक्त सरपंच, लोकप्रतिनिधी शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठान पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवाच्या संयोजनासाठी प्रतिष्ठान उपाध्यक्ष गजमल पवार, उपाध्यक्ष वसंत चौधरी, सचिव डॉ. सुलतान पवार, समन्वयक मंगलदास अहिरे, शशिकांत भुसावरे, सहसचिव रोहिदास गायकवाड, रघुनाथ चौरे, खजिनदार अतिराम पवार, वसंत भोये, देवा पवार, भिकन भोये, हसमुख चौरे, जीवन कोकणी, चंद्रसिंग बागुल, रामदास कोकणी, निलेश गावित, शिरीष पवार, दिलीप बागुल, राहुल चौरे, ईश्वर ठाकरे, रमेश बागुल, राजाराम भोये,गुलाब गांगुर्डे, घनश्याम बहिरम, प्रशांत जगताप,धनलाल बागुल,शांताराम गावित, नारायण चौरे, अविनाश कोकणी, रोहिदास कोकणी, संतोष पाडवी, गुलाब बागुल, तानाजी जगताप, रुपसिंग कोकणी, नंदलाल पांडवी, मगन पवार, वैजनाथ पवार, नवनाथ अहिरे, अरुण गावित, कैलास ठाकरे, कैलास बागुल, संतोष पवार, सोनू ठाकरे,चमारु ठाकरे,उज्वला गायकवाड, अनिता गवळी, जयश्री पाडवी, विजया बागुल,अंजनी चौरे, मनिषा चौरे, लता गांगुर्डे,संगीता पवार, मंगला चौरे, वैशाली गावित, लता जगताप, सिंधू गांगुर्डे, राजू चौधरी, जगन जगताप, अनिल पवार, कृष्णा महाले, हिरालाल पवार, संतोष चौरे, पंढरीनाथ चौरे, शिवाजी बहिरम, जगदीश कडवे, अनिल बागुल,काळु भोये, सुरेश ठाकरे, बाळू बागुल, राजू गांगुर्डे, पोपट पवार, रमेश गांगुर्डे, विजू पवार आदीने विशेष सहकार्य केले.
Post a Comment
0 Comments