सविस्तर वृत्त असे की भीमनगर सुभाषनगर प्रभाकर कॉलनी तसेच इस्लामपूरा भागातील रहिवाशांनी प्रशासनाला निवेदन सादर केले सदर निवेदनात म्हटले आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास वरिल परिसरातील नागरिक वास्तव्य करून रहात आहेत परंतु गेल्या पाच ते सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून महामार्गावर अनावश्यक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर बोगदे तयार केलले आहेत परंतु खरी गरज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बोगदा दिलेला नसुन स्थानिक नागरिक यामुळे प्रशासनावर नाराज आहेत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील आवश्यक ठिकाणी बोगदा न दिल्याने आठ फेब्रुवारी रोजी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी प्रशासनाला विनंती अर्ज केला नावेद फारुख शहा यांनी यासंदर्भात पत्रकाराना माहिती दिली आहे
Post a Comment
0 Comments