अनिल बोराडे
पिंपळनेर शहरातील राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी पाहिला छावा चित्रपट
शुरविरांच्या इतिहासाला उजाळा देणारा व आजच्या पिढीला ईतिहास प्रेरणा व आदर्श निर्माण व्हावा म्हणून चेअरमन संभाजी अहिरराव यांच्या संकल्पनेतून राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र निर्मित मराठी चित्रपट छावा PV सिनेमा ग्रुहात दाखवण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेतील असलेल्या इतिहासाला उजाळा देणारा चित्रपट छावा पिंपळनेर शहरातील PV सिनेमा चित्रपट ग्रुहात दाखवण्यात आल्याने सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचे चेअरमन संभाजी अहिरराव सरांचे आभार मानले व आज आम्हाला थोरविरांचा इतिहास आम्ही फक्त पुस्तकात वाचायचो परंतु चेअरमन संभाजी अहिरराव सरांच्या प्रयत्नामुळे छावा चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्यक्षात पहावयास मिळाल्याने आम्ही भारावून गेलो राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 19 तारखेला मोठ्या उत्साहाने अखंड भारताचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस शहरातील मुख्य चौका चौकात रैली व माता जिजाऊ व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सजिव देखावा चे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले संपूर्ण पिंपळनेर शहर भगवामय झाले होते
अशा अनेक उपक्रम राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आयोजित केले जातात
Post a Comment
0 Comments